चंद्रपूर /प्रतीनिधी :
महाराणी "पद्मावती" हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीसाठी चंद्रपूर येथे राजपूत क्षत्रिय समाज व हिंदू जागरण मंचाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.२७ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनात या संघटनांमार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना "पद्मावती" चित्रपटावर बंदी घालण्यात यावी या मागणी करण्यात आली.
संजय लीला भंसाली दिग्दर्शित महाराणी "पद्मावती" या चित्रपटात हिंदू धर्मातील महान वीरांगना राणी पद्मावती यांच्या गौरवशाली इतिहासावर व हिंदू परंपरेवर आक्षेपार्ह संवाद व दृष्ये निर्मात्यांनी चित्रीत केले आहे. या प्रकारामुळे हिंदू समाजात संतापाची लाट निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तरी हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करून या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. तसेच चित्रपट निर्माता संजय लीला भंसाली यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीलाधरुन चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना राजपूत क्षत्रिय समाज व हिंदू जागरण मंचाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी या दोन्ही संघटनांचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.