সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 24, 2017

आॅनलाईन मूल्यांकन प्रणाली परिचालित करणार - डाॅ. प्रमोद येवले

रामटेक येथे स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात 
अध्यापन कौशल्य विकास कार्यशाळेचे कार्यशाळेचे उद्घाटन

रामटेक- उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थी उत्तम प्रशासक म्हणून प्रशासनात यावेत यासाठी रामटेक येथे आय.ए.एस्. इ. परीक्षांकरिता स्पर्धा परीक्षा केंद्र’’ लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरूनी केली. या परीक्षाकेंद्राचा लाभ रामटेक तसेच विदर्भातील विद्याथ्र्यांना घेता येणार आहे. तसेच मुंबई येथे पार पडलेल्या संस्कृत शास्त्राीय स्पर्धेतील विजेत्या चमूला पाच हजार रूपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिकही कुलगुरूंनी जाहीर केले.’
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या शिक्षणशास्त्रा तथा संकीर्ण विद्याशाखेद्वारे अध्यापन कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन आज शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता विश्वविद्यालयाच्या रामटेक येथील मुख्यालयाच्या अतिथीगृह सभागृहात झाले. अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी भूषविले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डाॅ. कमल सिंग आणि विशेष अतिथी म्हणून भारतीय शिक्षण मंडळाचे संघटनमंत्राी मुकुलजी कानिटकर, कुलसचिव डाॅ. अरविंद जोशी आणि कार्यशाळेच्या समन्वयक आणि शिक्षणशास्त्रा तथा संकीर्ण विद्याशाखेच्या अधिष्ठाता डाॅललिता चंद्रात्रो हे विशेषत्वाने उपस्थित होते.  प्रास्ताविक कार्यशाळेच्या समन्वयक आणि शिक्षणशास्त्रा तथा संकीर्ण विद्याशाखेच्या अधिष्ठाता डाॅ. ललिता चंद्रात्रो यांनी केले. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या शुभहस्ते डाॅ. कमल सिंग आणि श्री. मुकुल कानिटकर यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. डाॅ. कमल सिंग यांनी ‘‘आपल्या भाषणात संस्कृत विद्यापीठाने अध्यापन कौशल्ये ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार अधिकाधिक होण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त आहेत. प्रत्येक शिक्षकाने स्वाध्याय, भाषेवर प्रभुत्व आणि सादरीकरण यावर मेहनत घेतली तर शिकविणे हे आनंददायी ठरेल आणि विद्याथ्र्यांपर्यंत संक्रमित होण्यास साहाय्यभूत ठरेल. कार्यशाळेत सहभागी प्रतिनिधीचा प्रत्यक्ष सहभाग असतो आणि तो असलाच पाहिजे तरच ती कार्यशाळा उपयुक्त ठरते. तसेच आपल्या कामाप्रती रुची आणि इच्छाशक्ती असली की त्याचे उत्तम परिणाम आपल्याला दिसून येतात. विशेष अतिथी श्री. मुकुलजी कानिटकर यांनी ‘‘कौशल्ये या शब्दाचा व्युत्पत्तीमूलक अर्थ स्पष्ट केला. फॅकल्टी म्हणजे मनाची व शरीराची जन्मजात शक्ती! ही शक्ती सर्वांमध्ये अंतर्भूत असतेच पण ती ओळखून विकसित करण्याचे कार्य आपल्याला करावे लागते. म्हणूनच आपल्याला शिकविण्याची गरज नाही तर ही शक्ती विकसित करण्यास शिकण्याची गरज आहे. विद्याथ्र्यांना स्वाध्यायाला प्रवृत्त कराल तरच ते ख-या अर्थाने स्वयं अध्ययन करण्यास आणि संशोधन करण्यास प्रवृत्त होतील. शिकण्याच्या प्रक्रियेने गुरु-शिष्य संबंध जोडल्या जातात, त्यांना संबोधन प्राप्त होते, त्यातून संस्कृती तयार होते आणि ही संस्कृती तयार करण्याचे मोठे दायित्व संस्कृत भाषा पार पाडत असते म्हणूनच संस्कृत विद्यापीठावर ही मोठी जवाबदारी आहे की त्यांनी हे दायित्व पार पाडण्यासाठी संशोधनकेंद्रित शिक्षणाला प्राध्यान्य द्यावे. गुरु-शिष्य संबंध-शक्तीचे निर्वहन योग्य झाले तर ही शक्ती दोघांमध्येही विकसित होईल आणि चांगला शिक्षक तयार करण्याचे आपले प्रयत्न सफल होतील.
कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यापासून संस्कृत विद्यापीठात केलेल्या कार्याची माहिती
दिली. परीक्षा विभागाचे रामटेक येथे स्थलांतर, वेदपाठशाळांना विश्वविद्यालयाशी संलग्नित करून स्वायत्तता प्रदान करणे, आॅनलाईन परीक्षा प्रणाली, केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अर्थात् रूसा कडे आर्थिक अनुदानासाठी सादर करण्यात येणारा प्रस्ताव इ. निर्णय हे विद्यापीठाच्या प्रगतीकरिता आवश्यक असून यामुळे अधिकाधिक संस्था, विद्यार्थी समाजाशी जोडले जाणार आहेत. अनेक संस्थांनी व पाठशाळांनी याबाबत संपर्क साधला असून त्यांच्याकडून प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली आहे. विद्यापीठात उच्च गुणवत्ता असलेले संशोधन झाले पाहिजे याबाबत आपण आग्रही आहोत

परीक्षा विभागाचे उद्घाटन
विश्वविद्यालयाच्या कुलगुरूपदाचा पदभार
स्वीकारल्यानंतर मा. कुलगुरू डाॅ. येवले यांनी नागपूर मध्ये असलेला परीक्षा विभाग रामटेक येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. आज रामटेक येथील परीक्षा विभागाचे उद्घाटन मा. कुलगुरू डाॅ. येवले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी डाॅ. कमल सिंग, श्री. मुकुल कानिटकर, कुलसचिव डाॅ. अरविंद जोशी, परीक्षा नियंत्राक डाॅ. उमेश शिवहरे, वित्त व लेखा अधिकारी डाॅ. रामचंद्र जोशी, यांची विशेष उपस्थिती होती. परीक्षा विभागाचे कामकाज रामटेक येथे सुरळीतपणे सुरू झाले असून लवकरच आॅनलाईन मूल्यांकन यंत्राणा परिचालित होईल अशी घोषणाही मा. कुलगुरूंनी याप्रसंगी केलीकायर्
क्रमाचे संचालन श्री. सुमीत कठाळे यांनी केले तर अतिथींचा परिचय डाॅ. रेणुका बोकारे यांनी तर आभार डाॅ. कलापिनी अगस्ती यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विश्वविद्यालयाशी संलग्नित विविध महाविद्यालयांचे प्राचार्य,
प्राध्यापक, रामटेकमधील विविध वृत्तपत्रांचे पत्राकार प्रतिनिधी तसेच शिक्षणक्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत मा. श्री. मुकुलजी कानिटकर, डाॅ. मनीष वानखेडे, संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकायाच्या अधिष्ठाता डाॅ. नंदा पुरी, डाॅ. गोपीचंद निंबार्ते, शिक्षणशास्त्रा विभाग प्रमुख डाॅ. इंदुमती भारंबे या विषयतज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.