गडचिरोली,: नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात एक जवान शहीद झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज, दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोटगुल येथील आठवडी बाजाराजवळ घडली. सुरेश गावडे असे शहीद पोलीस जवानाचे नाव असून सोनल खेवले व विकास धात्रक असे गंभीर जखमी जवानांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार विशेष अभियान पथकाचे जवान आज कोटगूल पोलीस मदत केंद्रांतर्गतच्या जंगलात नक्षल विरोधी अभियान राबविण्यासाठी जात होते. दरम्यान कोटगूल - सोनपूर रस्त्यावर आश्रमशाळेनजीक भरणार्या आठवडी बाजारामार्गे रस्त्याने जात असतांना नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यामध्ये सुरेश गावडे, सोनल खेवले व विकास धात्रक गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान सुरेश गावडे हे जवान शहीद झाले. तर गंभीर जखमी दोन्ही जवानांवर नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
शहीद सुरेश गावडे : -
हवालदार सुरेश गावडे हे गडचिरोलीच्या नक्षल विरोधी पथकात कार्यरत होते. त्यांनी अनेक अभियानामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. हवालदार गावडे याआधीही एका भुसूरुंग स्फोटातून बचावले होते. तसेच एका अभियानामध्ये गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान आत कोटगुल येथे नेमणूकीस असतांना त्यांचा अभियानातील सहभाग खुप उत्साही अन् तरुण सहकायर्यांना लाजवेल असाच होता. अभियानादरम्यान देण्यात आलेल्या कोणतीही जबाबदारी ते लिलया पूण करीत होते. मात्र आज कोटगूल येथील नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात काळाने त्यांच्यावर झडप घातली. लढवय्या शहीद हवालदार सुरेश गावडे यांचे अभियानातील मोलाचे कार्य केले असून इतर जवानांच्या ते सदैव स्मरणात राहणार आहे.