आमदार नानाजी शामकुळे : धानोरा, महाकुर्ला येथे विविध कार्यक्रम
चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये भोगोलिक विकास करण्याचा हेतूने सरकारच्या योजनेच्या लाभ घेऊन विकास करणे सोपी होणार आहे. उज्वला गॅस योजनेच्या लाभ घेऊन जंगलतोड थांबवून प्रदूषण मुक्त गाव करण्याच्या संकल्प सर्वानी करावा असे आवाहन आमदार नानाजी शामकुळे यांनी केले. ते धानोरा येथे उज्वला गॅस वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी धानोरा येथे २६ लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले तसेच नालीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासोबतच महाकुर्ला येथे प्रवेशद्वाराचे व एल. इ. डी. लाईट चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार नानाजी शामकुळे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभापती प. स. वंदनाताई पिंपळशेन्डे, सरपंच धानोरा हरीश गोखरे, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच नरेश देवाळकर, शेषराव आस्वले, विजयजी आगरे, विठोबा खोवले, श्रवण जुनघरे, दिवाकर बोन्डे, उपसरपंच उत्तमजी आमडे, इंदुराताई लोणगाडगे, कल्पनाताई मासिरकार, मंगलाताई गौरकार, मंगलाताई ठावरी, गीताताई आमडे, दशरथ बोन्डे, विठोबा कर्मणकार, विनायक बोबडे, अमोल नागराळे, संजय पटले यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार नानाजी शामकुळे म्हणाले कि, चंद्रपूर विधान सभेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे होत आहे. पुढे देखील अनेक योजनेच्या माध्यमातून विकास साधला जाईल. ग्रामस्थांनी देखील प्रत्येक योजनेच्या लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आपल्या भाषणात म्हणाले कि, चंद्रपूर जिल्याचा विकास झपाट्याने होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी आणून विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. यावेळी धानोरा, महाकुर्ला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.