সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 26, 2017

संविधान रॅलीच्या माध्यमातून संविधानाची ओळख

चंद्र्पुर / प्रतिनिधी :
 भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संविधानिक हक्क आणि कर्तव्ये याबद्दल नागरिकांमध्ये जागृती करण्यासोबतच संविधानाची ओळख करून देण्यासाठी संविधान दिनानिमित्य  चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती चंद्रपूर, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दि. २५ व २६ नोव्हेंबर ला संविधान सन्मान रॅलीचे आयोजन केले होते. २६ नोव्हेंबरला  दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन व सामूहिक राष्ट्रगान करून संविधान सन्मान रॅली चा प्रारंभ करण्यात आले व शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली होती. यामिरवणुकीमध्ये पथनाट्य, लेझिम,विविध प्रकारचे नृत्य संविधानाबद्दल संपूर्ण माहिती असलेले फलक,आदींचा समावेश व संविधानातील प्रमुख तरतूद, संविधानाला अभिप्रेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये, संविधानाने दिलेली नागरिकांची कर्तव्ये याबद्दल या सप्ताहात विशेष कार्यक्रमाचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीमध्ये संविधानापूर्वीचे स्त्री जीवन व संविधानामुळे घडलेल्या महिलांचे उदाहरण विविध देख्याव्यामार्फत दाखविण्यात आले होते . यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील आदी मान्यवरांची उपस्थित होती. सायंकाळी पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी या भव्य तिरंगा रॅली ला हिरवी झेंडी देत रॅली मार्गस्त केली. हि रॅली शहराच्या मुख्यब मार्गाने होत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ पोहोचली.








শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.