नागपूर : नामांकित आणि श्रेष्ठ व्यक्तिच्या आणि संस्थांच्या हित व
स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कारण
राजकारणात व्यक्तिपूजा हे अध:पतनाचा हमखास मार्ग असून ती नंतर
हुकुमशाहीकडे वाटचाल असते, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच दिला
असून ही गोष्ट पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी
उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी येथे केले.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित सामाजिक व आर्थिक समता संघाने तयार केलेल्या महाराष्ट्रातील गरीबी, असमानता व भेदभाव, अस्पृष्यता आणि अत्याचारांवरील अहवाल प्रकाशनाचे आणि परिषदेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समता संघाचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, डॉ. र्हदीप कांबळे, उपस्थित होते.