चंद्रपूर प्रतिनिधी :
चंद्रपुरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.शहरातील तुकूम परिसरात दुपारच्या सुमारास मराठी पाट्यासाठी आंदोलन करत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दुकान चाळीतील इंग्रजी पाट्यांना काळफासत इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून टाकली.
शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर दुपारी हा प्रकार घडला.तुकूमपरिसरात दुपारी मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या हातात मनसेचे झेंडे देखील होते. मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर या कार्यकर्त्यांनी अचानक इंग्रजी पाट्यांना लक्ष करत काळफ़ासले आणि काही इंग्रजी बॅनरही फाडले.अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केली.
चंद्रपुरात मनसेने नवीन शाखेचे उदघाटन केल्या नंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केले होते.आता पुन्हा एकदा मनसेने मराठी पाट्यांसाठी आक्रमक झाली आहे.