स्पेशल रिपोर्ट
पारशिवणी - प्रतिनिधी/ सतीश लिलादामोधर घारड
२०११ मध्ये ४० हजारांवर लोकसंख्या असलेली पिपरी कन्हान ग्राम पंचायत गेल्या ३ वर्षापूर्वी सिहोरा या गावासह नगर परिषद कन्हान पिपरी मध्ये रूपांतरीत झाली. सभोवतालचा ग्रामीण भागाचे उपशहर म्हणून उदयास आलेलं कन्हान क्षेत्रात ७० टक्के बेरोजगारीचे सावट आहे.जेव्हाकी परिसरातील २५ टक्के जागा ही औद्योगिकरणासाठी काबीज करण्यात आली आहे.म्हणून येथील रोजगाराचा प्रश्न हा सध्या 'आ' वासून उभा आहे.
बेरोजगारीच्या प्रश्ना मुळे येथे गुन्हेगारी प्रकरणे,राजकीय युवकांचा बॅनर वॉर, अवैध व्यवसायाकडे वाटचाल,८० च्या दशकातील काही राजकीय घडामोडिंमुळे भूतकाळातील काही औद्योगीक कँपन्या कुलूपबंद झाल्या आणि क्षेत्रात बेरोजगारीच्या समस्येने तळ मांडलाय
# औद्योगिक क्षेत्राने १६८ हेक्तर जागा काबीज
कन्हान परिसरात हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड यांची ०७ हेकटर ९७ आर,ह्युम पाईप-०९ हेकटर ०२ आर,नागपूर पावर (खंडेलवाल) १३ हेकटर १९ आर,रिता स्टील ०७ हेकटर ९३ आर,सुंदरम पेपर मिल १० हेकटर ९० आर,रिता स्टील (२) ०१ हेकटर ६७ आर,नागपूर पावर (खंडेलवाल) ११८ हेकटर अशी एकंदरीत १६८ हेकटर ६८ आर जागा कन्हान परिसरात औद्योगिक क्षेत्रासाठी काबीज आहे.
# कारखाने आजारी वाढली बेरोजगारी....
कन्हान येथे सर्वात मोठी ब्रुक बॉण्ड टी कंपनी होती.ती नंतरच्या काळात हिंदुस्तान लिव्हर मध्ये रूपांतरित झाली.यात काम करणारे कामगार २००१ पर्यँत कायमस्वरूपी ६६५ ते ४०० कामगार कंत्राट पद्धतीने काम करीत असत.या एकाच कंपनीची वार्षिक कर आकारणी ग्राम पंचायत काळात पिपरी ग्राम पंचायतीला १ कोटीच्या घरात जात होती.सहा वर्ष पूर्वी विदर्भ पेपर मिलमध्ये कायमस्वरूपी २०० व ठेकेदारीत २५० कामगार,तर २४ वर्षे पहिले बंद झालेली खंडेलवाल ट्यूब मिल येथे कायमस्वरूपातील ६५०,ठेकेदारीतील ५०० कामगार,तर १५ वर्षे अगोदर बंद झालेली खंडेलवाल फैरो अलाईन्स ९०० पक्कीत व ठेकेदारीत ८०० कामगार,३० वर्षे आधी ब्रुक बॉण्ड पूरक व्यवसायातील कपूर कंपनी येथे ४००,राय उद्योग ५० कामगार, सतत सात वर्षे बंद पडलेली ह्युम पाईप कंपनीत ९० कायम व ठेकेदारीतील ९८ कामगार बेरोजगार झालेत.
# नगर परिषदेच्या करावर परिणाम...
कंपन्या सुरू असताना ग्राम पंचायत काळात कर आकारणी स्वरूपात चांगली आवक होत असे.ज्याने ग्रामस्थांना सोयी-सुविधा उपल्बध करून देणे ग्राम पंचायतीला सोयीस्कर जात होते.परंतु नगर परिषदे मध्ये परिवर्तित झालेल्या नगर परिषदेचे बंद कंपन्यांनकडे काही थकबाकी आहे तर काहीनि करांची चुकवीनी केली आहे .ज्या कराची परिसराला मोठया प्रमानात विकास कामात मदत होत असते.या संपूर्ण कंपन्या भूतकाळात बंद झाल्यात परंतु वर्तमान स्थितीत जर सुरळीत सुरु असत्या तर कदाचित रोजगाराची क्षमता परिसरात नक्कीच वाढली असती.
# पैशे द्या नौकरी घ्या....टोळ्या झाल्या सतर्क...
सध्या क्षेत्रातिल बेरोजगारीचे प्रमाण बघता युवा वर्गाला कामाचे प्रलोभन देऊन ५००० ते १०,००० रुपया पर्यंत पैशे मागनार्या काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत.राजकीय वर्तुळातून मोठ मोठ्या नेत्यांशी हितसंबध असल्याचे दाखले देत युवा वर्गाला भ्रमित करत असल्याची माहिती काही बेरोजगार पीडित युवा वर्ग कडून सामोरी आलेली आहे.