गजेंद्र डोंगरे
कोंढाळी:-
(दि.२९/नोव्हें) राष्ट्रीय महामार्गावरुन गोंडखैरी-हिंगणा वळन रस्त्यावरच
गोंडखैरी परिसरात मंगळवारी रात्रीच्या साडेनऊच्या दरम्यान आयसर व ट्रक
कंटिनेरच्या धडकेत सेफेक्स कंपनिचे आयसर क्रं.एम,एच.४०-५०३७ आयसर वाहनचालक
नरेंद्र रामदास भगत वय ४७ वर्षे राहणार दवलामेठी(हेटी)आठवामैल,वाडी रोड
नागपुर हा सेफेक्स टपाल कुरीअर कंपनीचा वाहनचालक असून बुट्टीबोरी मिहान
इंडस्ट्रीज मधून येत असतांनी हिंगणा वळन रस्त्यावरच विरुद्ध दिशेने वेगाने
येत असलेले ट्रक कंटिनेर क्रं.एच.आर.५५ क्यु.७३०४ या दोघांमध्ये आमने-सामने
जब्बर धडक बसल्याने आयसर वाहनचालक नरेंद्र भगत जागिच घटनास्थळी मृत्यू
झाले.व ट्रक कंटिनेर वाहनचालकांचे दोन्ही पाय तूटल्याची प्राप्त माहीती
असून दोन्ही गाडी भिडल्याने आयसर ट्रक कंटिनेर वेगवेगळी करण्यासाठी
क्रेनच्या मदतीने वेगळे करुन त्यांना गाडीच्या बाहेर काढून त्यांना
ताबडतोब मेडिकल नागपुर येथे उत्तरीय तपासणी करीता ताबडतोब नेण्यात आले.
पुढील तपास सूरु आहे.