चिमूर /प्रतिनिधी :
चिमुर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पिपर्डा येथील शेतकरी दहा वाजताच्या सुमारास शेताकडे जात असतांना भरधाव दुचाकीने सायकलस्वारास जोरदार धडक दिली यात सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री पळसगाव - पिपर्डा मार्गावर घडली. गणपत दोडकु शेंद्रे (६०) असे मृतकाचे नाव आहे
दुचाकीस्वार महेश वासुदेव पुसाव (२३) पिपर्डा हे कामानिमीत्य पळसगाव येथे आले होते. काम आटोपुन शुक्रवारला रात्री दहा वाजता MH 34 AZ 6384 या दुचाकीने पिपर्डा येथे जात होते. दुचाकीचा लाइट कमजोर व गळद रात्र असल्याने रस्ता बरोबर दिसत नव्हता. त्यामुळे सायकल व दुचाकीची जोरदार धडक झाली. ज्यात गणपत शेंद्रे याचा जागीच मृत्यु झाला.
या घटने दुचाकीचालकाच्या डोक्याला जबर मार लागला असून यास उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मृतक यांचे शव विच्छेदन करन्यात आले. असून पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.