सावरगावच्या सरपंचाच्या तक्रारींवर नरखेड पोलिसांचा अजब न्याय
नागपूर - नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे पाणी टंचाईला वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर आज मोर्चा काढला. चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपचंयात कार्यालयाची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि पाणी प्रश्नाचा पाठपुरावा स्थानिक बातमीदार योगेश गिरडकर यांनी केला. त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवकाने जाणीवपूर्वक तक्रार देत बातमीदारास आरोपीच्या पिंज- यात उभे केले.
सरपंच आणि ग्रामसेवकाने नरखेड पोलिसांत तोडफोडीची तक्रार दिली. यात मोडतोड करणारे दहा-पंधरा ग्रामस्थांच्या यादीत योगेश गिरडकर यांचेही नाव गोवण्यात आले आहे. या प्रकरणी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस योगेश कोरडे यांनी पोलिस अधिकारीशी बोलून पत्रकारावर गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती केली.