भद्रावती नाभिक संघटनेने दिले निवेदन
वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :- नाभिक समाजाविषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी मंगळवारी भद्रावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात बोलताना नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने नाभिक समाजात असंतोष निर्माण झाला आहे. नाभिक समाजातील विविध प्रकारच्या संघठनांतर्फे काल भद्रावती तहसील कार्यालयात गेलेल्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नाभिक समाज संघटनेचे बंडू लांडगे, सचिन नक्षीणे, नाभिक दुकानदार संघठनेचे रविंद्र शेंडे, अंकुश दर्वे जेष्ठ नागरिक संघठनेचे बाबुराव जुनारकर महिला संघटनेच्या माया चिंचोलकर, वर्षा वाटेकर, शोभा लांडगे, छाया जमदाडे, गौरी नक्षीणे नाभिक महामंडळाचे निलेश देवईकर सागर घुमे आशीष चौधरी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.