সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 28, 2017

"मुत्रीघरासमोर प्रवासी बसतात बसच्या प्रतीक्षेत"

बसस्थानक नसलेल्या गडचांदूरची दुर्दैवी कथा...
गडचांदुर/ प्रतिनिधी:-
औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहर सद्या अतिशय बिकट स्थितीतुन समोर जात आहे.कोरपना तालुक्यातील गडचांदुर शहराची ओळख हि औद्योगिक शहर म्हणून आहे. गडचांदूर जरी औद्यागिक शहर असले तरी मात्र शहरांतील स्थानिकांना याठिकाणी जीवन जगण्यासाठी रोज विविध 
समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण, शुद्ध पाणी,वाहतुक व्यवस्था,आरोग्य व्यवस्था, हे तर या असतात समस्या आहेतच मात्र "असून नसल्या"सारख्या सोयीत प्रकल्प असून बेरोजगारीचे संकट, धरणे असून पाण्याचे संकट, सुसाट बाईकर्सवर नियंत्रण नसल्याने जीवाचे संकट,यासारख्या अश्या कित्येक लहान मोठ्या संकटांना समस्याना सध्या गडचांदूरकर निमुटपणे सहन करीत आहे. यावर पुन्हा बस स्थानकच्या समस्येची भर पडली असून हि समस्या गडचांदूरच्या नागरिकांसाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे .

गेल्या काही महिन्यानपुर्वी येथील मुख्य मार्गाचे काम सुरू होते. हे बांधकाम सुरु असतांना या ठिकाणी पूर्वी असलेला जुना प्रवासी निवारा तोडण्यात आला. तेव्हा पासुन अनेक प्रवासी अक्षरश: प्रसाधनगृहा समोर तसेच इतर ठिकाणी बसुन बसची वाट बघत आल्याचे विदारक दृश्य गडचांदूरकर अनुभवत आहे  
स्थानिक नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या पदग्रहण समारंभात क्षेत्राच्या आमदार महोदयांनी  लवकरच भव्य सर्व सुविधा युक्त बस स्थानकची निर्मीती करण्यात येणार असल्याचे वक्तव्य भर कार्यक्रमात  केले होते.मात्र चार महिने उलटून गेल्या नंतरही गडचांदूरकरांना मुत्रालयसमोरच प्रवासी बसची वाट बघत राहावे लागत आहे.
गेल्या काही दिवसात या बसस्थानकासाठी  दोन जागेची पाहणी करण्यात आली . या पैकी एक जागा निश्चित करण्यात येत आहे .अंदाजे चार महिन्यांच्या कालखंडा नंतर ही बस स्थानकाचा मुहूर्त काही निघत नसल्याने  "आमदार साहेब गडचांदुर बस स्थानकाचा मुहूर्त निघणार तरी केव्हा? असा प्रश्न गडचांदूरकर  विचारात आहेत


सध्या मोठ्या बस स्थानकची निर्मिती होईपर्यंत या मार्गाच्या दोन्ही बाजुला आधूनिक पद्धतीचा लहान प्रवासी निवारा तरी उभारा,अशी मागणी नागरिकांची होती मात्र संबंधितांनी याकडे कानाडोळा करत प्रसाधनगृहाच्या बाजूलाच टिनाचे वाहतूक कार्यालय बनविले मात्र प्रवासीनीवाऱ्याला इतके महत्व दिले नाही.याच मुत्रीघराच्या जवळ वाहतूक नियंत्रक यांचे कार्यालय आहे मात्र ईथली परिस्थिती बघता बस स्थानाक नसल्याने  शाळकरी मूले सर्व प्रवासी उन्हाचे चटके सहन करत इकडे -तीकडे उभी दिसतात. यामूळे अनेक वृद्धांना विशेषत: लहान मुलं सोबत असलेल्या महिलांना कमालीचा शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे प्रवाश्यांची धडपड संबंधितांनी लक्षात घेऊन उद्धभवलेली बस स्थानकची समस्या त्वरित मार्गी लावावी अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे.लवकरात लवकर असे झाल्यास गडचांदूरकर संबंधितांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असा सूर ऐकायला मिळत आहे .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.