

सविस्तर वृत्त असे की रामटेक -नेरला ही बस क्रमांक एम एच-07,स-7518 आज नेहमीचा चालक व वाहक सुटीवर असल्याने उषीरा रामटेक बसस्थानकावरून सुमारे 5.45 वाजता सुटली.अपघातस्थळ हे बसस्थानकापासून सुमारे दीड कीमी अंतरावर आहे.याठीकाणी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस आपल्या भरधाव वेगात रस्ता सोडून डाव्या बाजुला घुसली.या घटनेत 10-12 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.घटनेची माहीती मीळताच रामटेकचे पो.नी योगेश पारधी यांनी पोलीस कर्मचारी यांचेसह घटनास्थळ गाठले. जखमी यांना रामटेकच्या उपजिल्हारूग्णालयांत दाखल करण्यात आले व काही जखमी यांना नजिकच्या डाॅ.पाठक यांच्या किमया ईस्पितळांत भरती करण्यांत आल्याचे पोलीसांनी सांगीतले.
बसचा चालक एस आर चहांदे याचे नियंत्रण सुटल्याने घटनास्थळी रस्त्याच्या कडेला सिंधरागीरी पतसंस्थेचे दैनिक बचत एजंट मनोहर हत्तीठेले हे आपली बाईक पल्सर क्रमांक एम एच 40,क्यू-9954 ठेवून हाॅटेल सम्राट येथे कलेक्षन करण्यासाठी गेले होते त्यामुळे ते बचावले मात्र त्यांचे उपरोक्त वाहन चकनाचूर झाले आहे.
सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही.सदर बसचा चालक हा दारू पीउन होता अषी चर्चा लोक करीत होते.रामटेक पोलीसांनी याप्रकरणी चालकाविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला असून रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत