সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 27, 2017

शेतकरी अस्मानी संकटापेक्षा सुलतानी संकटात जास्त - खा. राजू शेट्टी

गजेंद्र डोंगरे/कोंढाळी:-
 स्वभिमानी शेतकरी संघटनेचे  संस्थापक  खासदार राजू शेट्टी यांनी अमरावतीकडे निघाले असतांना 
 नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्याचे जुनापानी व परिसरातील  शेतक-यांनी  जुनापानी येथील शेतकरी उत्तमराव काळे यांचे  नेतृत्वात   खासदार राजू शेट्टी याची  27नव्हेंबर ला साकाळी 10-30वाजता  जुनापानी गावात  भेट  घेऊन या भागातिल समस्या मांडल्या . 
 या प्रसंगी चंदनपारडी चे उपसरपंच सतीश पुंजे यांनी या भागात कापुस उत्पादक  शेतकरी लाल्या व बोंड अळीच्या प्रदुरभावाने कसा हवालदिल झाला आहे,तसेच संत्रा , सोयेबीन ची कशी वाट लागली व सरकार कडून होनारी पिळ नूकी बाबद  माहीती दिली.तर जि.प. सदस्य रामदास मरकाम यांनी जि.प. मधे शेतकर्याची अडवनूकीचा पाढाच वाचला,  उत्तम काळे व दिलीप  काळे यांनी  त सेच खासदारां सोबत आलेले वस्त्रोध्दोग महामंड़ळाचे  माजी अध्यक्ष रवीकांत तुपकर,युवा स्वभिमानी चे शामअवथ॓ळे यांनी शेतकर्यांच्या गर्हाणे व सत्यता मांडली.



 केंद्र  व राज्य सरकारचे धोरण शेतकरी  विरोधी
       या प्रसंगी खासदार शेट्टी यांनी  या भागातील शेतकर्यांचे कपाशी चे पीकाची पाहणी साठी स्वतः शेतकर्याचे कपाशी पहन्यास दिलीप काळे  यांचे शेतात पोहचले व कपाशी व त्यावरील बोंड़ अळी चा प्रदुरभाव व लाल्ल्या ची पाहणी केली. या प्रसंगी परिसरितील शेकडो शेतकर्यांशी संवाद साधत  म्हणाले हे मोदी सरकार शेतकर्यांटे जखमावर मीठ चोळत आहे,शेतकर्याना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले आहे.

 शाश्वत शेती साठी मदत करत नाहीत,  पंतप्रधान पी क वीमा योजना ही शेतकर्या पेक्षा वीमा कंपण्यांनाच कश्या पोषक आहेत याचे उदाहरने देऊन सांगितले.  तर शेतकरी भिकारी   नसुन अन्नदाता आहे  सरकारचे शेतकरी वीरोधी धोरनाचा फटका शेयकर्याला बसत आहे या बाबद  सरकार ला अनेक दा निदर्शनात आनून दिले आहे.   या भागात कपाशी संत्रे वअन्य पीक कसी शेतकर्याच्या हातंन जात आहे तरी सरकार ढिम्म आहे. 

 डी बीटी चा फटका ही शेतकरीच सहन करत आहे  तेंव्हा युवा शेतकर्यांनी संघटीत होने गरजेचे आहे असे आवाहन ही  राजूशेट्टी  यांनी कली. या प्रसंगी शेतकर्यांनी कपाशी च्या हार घालून त्यांचे गावकर्यांनी स्वागत केले. या प्रसंगी दुध संघाचे अध्यक्ष भास्कर पराड यांनी दूध ऊत्पादक शेतकर्याच्या व्यथा मांड़ल्या तर प्रशांत खंते व आकाश गजबे  पं स  सद स्य डगदिश डोळे यांनी युवा शेतकर्यांच्या समस्या व डी बी टी बाबद  होनारी शेतकरी  अडचनीचे निवेदन दिले. या वेळी  शिवाजी जामदार,सुदर्शन डोंगरे, उत्तमकाळे,दिलीप काळे, बबनराव देशमुख,देवीदास सोमकूवर मानिकराव काळे, गजानन ढोबाळे, रामचंद्र टीपले,नथ्थुजी रमधम,नंदकिशोर  अवथळे नथ्थूजी देशमूख, भोजराज अवथळे,प्रदिप बारंगे यांनी  ही आप आपल्या समस्या माडल्या.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.