किल्ला सफाईच्या 250 व्या दिवसानिमीत्त
चंद्रपूर- किल्ल्याची सफाई मागील 250 दिवसांपासून चंद्रपूरातील इकोदृप्रो ही तरूणांची संघटना करीत आहे. या सफाईचा उल्लेख पंतप्रधाण माननिय नरेंद्र मोदी यांनीही आपल्या मण की बात या कार्यक्रमात केला आहे. दोनषे पन्नास दिवस झाल्याच्या निमीत्ताने चंद्रपूरातील नागपुर विद्यापिठ षिक्षण संघ (नुटा), डाॅ.बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएषन, आणि इंटॅक, चंद्रपूर चॅप्टर या संघटनांनी चंद्रपूरातील संपूर्ण इकोदृप्रो टीमचा नागरी सत्कार नुकताच आयएमए हाॅल चंद्रपूर येथे केला.
इकोदृप्रो संघटनेचे अध्यक्ष बंडू धोत्रे आणि त्यांची संपूर्ण चमू चंद्रपूर परकोटाच्या सफाईत सतत कार्यषील आहे. या सफाईमुळे किल्ल्याच्या परकोटाचे स्वरूप पार बदलून गेले आहे. अजूनही हे काम पुढील अनेक दिवस पर्यंत चालेल असे दिसत आहे. या तरूणांना उर्जा मिळावी यासाठी विविध षिक्षक संघटनांनी या सत्काराचे आयोजन केले होते.
यावेळी मंचावर चंद्रपूर चे आमदार माननिय नानाभाऊ षामकुळे, अॅड. विजय मोगरे, डाॅ. मणिश मुंघडा, प्राचार्य प्रभु चोथवे, राजेष मुण, डाॅ. मंगेष गुलवाडे यांची उपस्थिती होती.यावेळी इकोदृप्रो संघटनेतील ज्या ज्या तरूणांनी किल्ला सफाईत भाग घेतला अषा सर्व तरूणांचा नागरी सत्कार चंद्रपूरचे आमदार नाना षामकुळे यांच्या हस्ते केला गेला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाशणातून नानाभाऊ षामकुळे यांनी विविध वेळी इको प्रो टीमने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. चंद्रपूरातील किल्ला सफाई देषाला मार्ग दाखवणारी आहे असे गौरवोद्गार नाना षामकुळे यांनी काढले. बंडू धोत्रे यांनी किल्ला सफाईच्या अभियानात सुरूवातिपासून आलेल्या अडचणी आणि नंतर कामात केलेल्या सुधारणा यांचा उल्लेख केला, किल्ला सफाईनंतर लोकांनी घान करू नये यासाठी लोकांनीच आता उपाययोजना करायची गरज आहे, लोकांत याबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून किल्ला सफाई दौड आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यषस्वीततेसाठी नुटा संघटनेचे प्रा. योगेष दुधपचारे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर गोडवाना युनिव्हर्सीटी असोसाएषन चे डाॅ. मिलींद जांभुळकर, डाॅ. प्रमोद षंभरकर, इंटॅक चंद्रपूर चॅप्टर चे श्री अषोकसींह ठाकूर, प्रविण निखारे, प्रा. कमलाकर धाणोरकर, कुणाल जोरगेवार, आकाष दुधपचारे यांनी अथक प्रयत्न घेतले. संचालन प्रा. योगेष दुधपचारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण निखारे यांनी केले.