चंद्रपूर/ मूर्तिजापूर- - शेतकऱ्यांच्या
शेतमालाला बऱ्यापैकी भाव नाही. त्यामुळं कापसाच्या बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी शेतकरी जात नाही. अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच भरून ठेवला आहे.
विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे कापूस हे नगदी पीक आहे. चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहे. शासनाने कापसाला दिलेला हमीभाव, त्यापेक्षा अतिशय अल्प आहे. कापसाला भावच नसल्याने अतिशय अल्प दरात कापूस कसा विकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना चांगलाच सतावत आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील कपाशीचे नुकसान!
मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच शिवाय पांढर्या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे.