मुंबई :शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुक रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा विधानपरिषेदतला पत्ता कट झाला असून,त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आयात झालेल्या प्रसाद लाड यांना विधानपरिषदेच्या तिकीटाची लॉटरी लागली आहे.विधानपरिषद पोटनिवडणुसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली असून ते आता भाजपच्या वतीने विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहेत.
नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे विधानपरिषदेचं तिकीट नारायण राणे यांनाच मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र भाजपने नारायण राणे यांना डावलून प्रसाद लाड यांना पसंती दिली आहे. विशेष म्हणजे या पोट निवडणुकीसाठी काही काळ माधव भंडारी यांचं देखील नाव चर्चेत होत. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.येत्या 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.