সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 28, 2017

चंद्रपुरात ग्रंथ महोत्सवाचे थाटात उदघाटन ; शहरातून निघाली भव्य ग्रंथदिंडी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्य शासनातर्फे रावबिण्यात येत असलेल्या वार्षिक ग्रंथ महोत्सवाची सुरुवात आज चंद्रपुरात करण्यात आली.ग्रंथ महोत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता ज्युबली हायस्कुल ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह पर्यंत भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडी चे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन समारंभ पार पडले. यावेळी मुख्य उदघाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महापौर अंजली घोटेकर,ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवर उपस्थित होते.

28 व 29 नोव्हेंबर या काळात संपन्न होणा-या या कार्यक्रमामध्ये वाचन संस्कृतीला चालना देणा-या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यक्रमाचे वैशिष्टय विद्यार्थ्यांचा सहभाग ठरले. विविध वेशभूषेत शाळांचा सहभाग, लेझीम पथक, एनसीसी, स्कॉऊड गाईड, एनएसएस पथक तसेच आकर्षकरित्या सजवलेल्या ग्रंथदिंडीने शहर वाशियांचे लक्ष वेधल्या गेले.

वाचन संस्कृतीला चालना मिळावी या साठी या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केल्या गेले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन, संस्कृती व साहित्य चळवळीशी संबंधित भरगच्चं कार्यक्रम होणार असून त्यानिमित्य नागरिकांनी पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुलांशी संवाद साधतांना पुस्तकांच्या वाचनासोबतच सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. महापौर अंजलीताई घोटेकर यांनी पुस्तक आणि खेळामुळे व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळत असून त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी चंद्रपूर जिल्हयात ग्रंथालय चळवळीचे योगदान यावर प्रकाश टाकला. जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी अभ्यासिका सुरु करण्यात आल्या असून ग्रंथालय बळकटीकरणाची मोहीम सुरु आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी केले. या सत्राचे संचालन मनिषा गिदेवार यांनी केले. यानंतर दुपारी पर्यावरण सद्यास्थिती व उपाय यावर विद्यार्थ्यांचा परिसंवाद रंगला. जेष्ठ कवी प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. तर सांयकाळी व-हाडी झटका हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद ग्रंथालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती या सर्वांचा समन्वय साधत हे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी ग्रंथप्रदर्शनी व विक्री दालनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उदया या ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस असून मोठया संख्येने सकाळी 10 ते सांयकाळी 7 पर्यंतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता व्याख्यान, दुपारी 12 कवी संमेलन, दुपारी 3 वाजता वादविवाद स्पर्धा तर सांयकाळी 5 वाजता ग्रंथालयात अभ्यास करुन शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सांयकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रम होणार आहे.

हे कार्यक्रम २ दिवस चालणार असून या कार्यक्रमात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून संस्कृती आणि ग्रंथालय याबाबत डॉ.पदमरेखा धनकर, डॉ.प्रा अशोक मथानकार यांचे व्याख्यान नागरिकांना ऐकायला मिळणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता या ग्रंथोत्सवाच्या समारोप होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. अहिर तर प्रमुख उपस्थिती ना. मुनगंटीवार, खा. अशोक नेते, आ. भांगडिया,आ. ना गो गोणार,आ.अनिल सोले,आ. नानाजी शामकुळे,आ. विजय वडेट्टीवार.आ. धानोरकर आदी उपस्थित राहणार आहेत.













শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.