मूल: तालुक्यातील गांगलवाडी येथिल शेतकरी परशुराम सकाराम बोलमवार वय 42 या शेतक—याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मृतक शेतकरी परशुराम बोलमवार याला तीन मुली, पत्नी व आई असा परीवार असुन अनु्क्रमे मोठी मुलगी 5 व्या वर्गात, 2 —या वर्गात व पहिल्या वर्गात आहे. त्याला दीड एकर शेती असून शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते.या मृतक शेतक—याने 2008—9या वर्षात कर्ज घेतले होते अशी माहिती आहे. यावर्षी पाणी पाऊस नसून धानाला मावा,तुळतुळा,खोड किडी या रोगाने ग्रासले असून शेतक—याचे पिकही झाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आला असतांनाच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी केली असल्याने शेतक—याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार व मूल नगर परीषदेचे नगरसेवक विनोद कामडे यांनी लगेच घटनास्थळी भेट घेतली व घटनेचा रोष व्यक्त करत शेतक—याच्या कुटंबाला सरकारने भरीव मदत करावी असे मत व्यक्त केले. मूल तालुका अर्थमंत्री व जिल्हृयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असून त्यांचे क्षेत्रात या शेतक—याची आत्महत्या होत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.
Thursday, November 23, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या चंद्रपूर/ब्रम्ह्पुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळना नवेगाव येथील शेतकरी प्रविण वाम
चंद्रपुरात माजी संघ प्रचारकाची आत्महत्या चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर येथील समाधी वॉर्डातील रहिवासी संतोष दीक्षित यांनी स्वत:च्या घर
सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी वरोरा-भद्रावती/(प्रतिनिधी) वेकोली वणी क्षेत्रातील भद्रावती तालुक्यायील ताडाळी( उर्जाग्राम) येथील
कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या वरोरा/प्रतिनिधी: रोगराईने पिके नष्ट झाल्याने तसेच कर्जाचे डोंगर असल्याने कर्जाची परतफेड
अशोक अग्रवाल आत्महत्या प्रकरण;चारही आरोपींना जामीन मंजूर चंद्रपूर/प्रतिनिधी: स्वामी फ्युएल कंपनीत लेखापाल अशोक अग्रवाल यांच्या आत्महत्या प्रकरणातील चार आ
प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या चंद्रपूर/प्रतिनिधी: एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंग
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য