गजेंद्र डोंगरे/कोंढाळी : विदर्भावरिल
अन्याय दुर करन्यासाठी व आपल्या हक्कासाठी आपण एक जुट झाल्या शिवाय
वेगळा विदर्भ होणे शक्य नाही. या साठी आजी माजी राज्यकर्ते फक्त खुर्चिचे
पाईक होऊन बसले आहेत. विदर्भाच्या तरूणाच्या हातला काम द्यायचे असल्यास
वेगळया विदर्भाशिवाय पर्याय उरला नाही. अशी स्पष्टोत्ती विदर्भवादी नेते
राम नेवले यांनी कोंढाळी येथील बाजारचौकात 25नव्हेंबर चे दुपारी
11-30वा. आयोजित सभेत सांगितले . या प्रसंगी अरूण केदार यांनी विदर्भाच्या
नांवावर निवड़नूक जिंकनारे आता सक्षम.विदर्भाची भाषा बोलनारे व आपल्या
शब्दाला न जागनारे नेते आधी काय होते व आता कसे कोट्याधिश झाले या बाबद
नावां नीशी कुंडललिच वाचली, वेगळा विदर्भ कोर कमेटी अरविंद देशमूख यानी
विदर्भाची माहिती दीली, तसेच विदर्भ व काटोल जिल्हा तसेच कोंढाळी तालुका
बनवायचा असेल तर आधी विदर्भ वेगळा होणे फार गरजेचे आहे असे मत
वि.रा.आं.स.चे उपाध्यक्ष संजय डांगोरे यांनी विचार मांड़ले.तर माजी पं.स.
सदस्य मुस्ताक भाई, गोविंद चंदेल,शामराव तायवाडे यांनीही मार्गदर्शन
केले
याप्रसंगी जनार्धन नाफडे, प्रभाकर काळे, शेख
गफ्फार, नीतीन ठवळे, प्रशांत खंते ,आकाश गजबे,नारायनराव गायकवाड, कुणाल
भांगे,भूषण चांड़क, जे.डेहणकर, गड़ीजी खोबरकर, विनोद गुप्ता, वैभव.दुधे,
विनोद शेंडे यांच उपस्थिती हा कार्य क्रम संपन्न झाला .कार्यक्रमानंतर
वेगळ्या विदर्भाचा जयघोष करन्यात आला. कार्यक्रमाचे संचलन दुर्गाप्रसाद
पांडे तर आभार प्रमोद धारपुरे यांनी केले.