नागपूर- लोकसभा युवक काँग्रेसची जनचेतना यात्रा बाईक रैलीचे नागपुर (संघ) ते
वाराणसी (मोदी) जागोजागी २७२ ठिकाणी भव्य स्वागत झाले.वाराणसीच्या अंतिम
पडावात पोहचताना तेथील प्रधानमंत्र्याच्या विरोधातील लोकसभा उमेदवार
मा.आमदार अजय राय यांच्या व नागपूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष व नगरसेवक
बंटी शेळके यांच्या नेतृत्वात बाईक रैलीने संपूर्ण शहर पिंजुन
काढले.लोकांचा प्रचंड प्रतिसाद हा प्रधानमंत्र्याच्या विरोधात नाराजी
दर्शवित होता.जागो-जागी जंगी स्वागत करण्यात आले नंतर संघाचा गणवेश असलेली
खाकी चड्डी व काळी टोपीची राख गंगा नदीच्या मधोमध विसर्जित करण्यात
आली.रिवा येथे रैली दाखल होताच तेथील लोकसभा युवक कांग्रेस अध्यक्ष
दिवाकरराव द्विवेदी व त्यांच्या युवक सहकार्याने जोरदार स्वागत केले.कटनी
येथे खजुराहो लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष मन्नू दीक्षित यांनी जाहिर
सभा लावली सभेत बोलताना नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक
बंटी शेळके म्हणाले आमच्या रैलीला ठीक-ठिकाणी स्वागत व फुलांचा वर्षाव होत
आहे.जबलपुर सिवनी येथील विधानसभा अध्यक्ष आनंद पंजवानी व त्यांच्या
सहकार्याने भव्य-दिव्य स्वागत केले व संपूर्ण शहरात रैली फिरवली तेथे
मध्यप्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष व युवकांचे हृदय सम्राट मा.कुणाल चौधरी
रैलीत सहभागी झाले.त्यानंतर सिवनी येथील शुक्रवारी बाजार येथे जाहिर सभा
झाली सभेत मा. कुणाल चौधरी यांचे तडफ़दार भाषण या सभेचे खास आकर्षण
ठरले.बंटी शेळके बोलताना म्हणाले की केंद्र सरकार व भाजपा शासीत राज्यात
सरकार स्पशेल अपयशी ठरले आहे.याच कारणाने मला नागपूर ते वाराणसी
नोटबंदी,GST,बेरोजगारी,महगाई,शे
तकऱ्यांच्या आत्महत्या,खोटे-खोटे
आश्वाशन या सारखे विषय घेऊन बाईक रैली काढावी लागली मा.कुणाल चौधरी यांचे
संपूर्ण रैलीला सहकार्य व मार्गदर्शन लाभले मा.कुणाल चौधरी यांचे सोबत
नागपुर लोकसभा युवक काँग्रेसची रैली कुरई,धुमा,छपारा,लखनादौन व
मध्यप्रदेशातील ईतर भागातही जंगी स्वागत झाले.जनचेतना सरकार वरील नाराजीचा
सुर जाणवत होता रैली परतिच्या मार्गावर असतांना मनसर,कांद्री,कन्हान,कामठी
येथून स्वागत व अभिनंदन स्वीकारुन जसवंत टॉकीज इंदौरा चौक येथे आली असता
तमाम युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व काँग्रेस नेत्यांनी स्वागत कारित
अभिनंदानाचा वर्षाव केला तेथे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर। च्या पुतळ्याला
माल्यार्पण करुन रैली गोलीबार चौकात येथे फटाके फोडून आतिशबाजी करण्यात आली
माजी नगरसेवक भोला बैसवारे,कांग्रेस कमिटीचे शहर चिटणवीस हसमुख
छागलानी,मोतीराम मोहाडीकर,अखिल भारतीय सफाई मजदुर कांग्रेस चे अध्यक्ष
विक्की बढेल यांनी गोलीबार चौकात भव्य स्वागत केले।भारतमाता चौक येथे भारत
मातेच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन मारवाड़ी चौकातील पंडित जवाहरलाल
नेहरूजीच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन मासुरकर चौक,शहीद चौक येथील विदर्भ
चंडीकेचा आशीर्वाद घेऊन गांधी पुतळा CA रोड येथे आली राष्ट्रपिता महात्मा
गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन बड़कस चौक येथे पोहचली बड़कस चौक येथे
वाराणसी येथून आणलेली ८०० लीटर गंगाजलचे निःशुल्क वितरण करण्यात आले सुमारे
९०० लोकांना गंगाजल वितरित करण्यात आले.या मागील स्पष्ठ भूमिका अशी की
रामजन्मभूमी मंदिर निर्माण च्या वेळेस RSS,विश्वहिंदू परिषद व भाजपा नी
लोकांना फसवून विटा व गंगाजल विकल्या होत्या आता हे ही सिद्ध झाले नुकतेच
निर्मोही आखाड़ाने ६ दिवस अगोदर आरोप लावला होता की RSS विश्वहिंदू परिषद ने
सुमारे १४०० करोडे रुपये विटा व गंगाजल च्या नावाने जमा करुन आपले घर भरले
म्हणून बंटी शेळके यांच्या नेतृत्वात नागपूर लोकसभा युवक काँग्रेस द्वारा
बड़कस चौक संघमुख्यालया समोर निःशुल्क गंगाजल लोकांना वितरण करण्यात आले
तसेच प्रथम नागरिक महापौर नंदाताई जिचकार व उपमहापौर सहित सर्व गणमान्य
व्यक्तीना गंगाजल वितरित करण्यात येईल.बड़कस चौक येथील कार्यक्रमानंतर
कोतवाली चौक येथील महान त्यागी स्व पूनमचंद रांका यांच्या
पुतळ्याला,नर्सिंग टॉकीज येथील माजी मंत्री भाऊसाहेब सुर्वे यांच्या
पुतळ्याला माल्यार्पण करुन सभा घेण्यात आली सभेला प्रचंड प्रतिसाद
होता।शिवाजी पुतळा येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाप्रतापी राजा
शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुतळ्याला माल्यार्पण केले
फटाकेची आतिशबाजी करुन माजी नगरसेवक बाबा शेळके यांनी स्वागत केले।बंटी
शेळके यांनी रैलीला ज्या लोकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले तसेच
मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश येथील युवक काँग्रेसच्या व जनतेचे मी मनापासून
आभार मानतो.आभारप्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली या वेळेस
प्रामुख्याने नागपुर लोकसभा युवक काँग्रेस महासचिव आलोक
कोंडापुरवार,राजेंद्र ठाकरे,स्वप्निल बावनकर,अक्षय घाटोळे,स्वप्निल
ढोके,अखिलेश राजन,हेमंत कातुरे,निखिल बालकोट,ओमदीप झाडे, फरदीन खान, नखिल
अहमद,आशीष लोनारकर,राज बोकडे,पूजक मदने,अतुल मेश्राम,निखिल गौरकर,विक्की
गौर,प्रफुल राज वैद्य,वरुण पुरोहित,सौरभ वानखेड़े,नीलेश सावरकर,हर्षल
बहादुले,विक्की नटिये,आलोक जोशी, रामचंद्र नांदने,सौरभ शेळके,इशांत
शनगनवार,धीरज शेंन्द्रे,रोहित खैरवार,पवन जोशी,निखिल मंगरुलकर,आनंद
महाजन,विजय हाथबूडे,तुषार मदने,पंकज वारजुरकर ,दिवाकर पलांदुरकर व असंख्य
सहभागी झालेले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्तिथ होते.
Friday, November 24, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য