সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 24, 2017

वन्यप्राण्यांपासुन शेती वाचविण्याची शक्कल लढविणा-या विठ्ठलचा सत्कार

           नगरपालिका व वनविभागाने घेतली दखल         

पंतप्रधान नरेन्द्र मोदींपर्यंत जाणार माहिती
वरोरा/भद्रावती (प्रतिनीधी) :
             साऊंडसिस्टममधे वाघ व कुत्रा या प्राण्यांचे आवाज वाजवून वन्यजीवांच्या हैदोसापासुन शेतीचे नुकसान टाळण्यासाठी विठ्ठल विधाते यांनी केलेल्या युक्तीची दखल भद्रावती नगरपालीका व वनविभागाने घेतली आहे. मुख्याधिकारी विनोद जाधव, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी महेशकर मैडम, क्रुषी अधिकारी ढवस यांनी विठ्ठलाचे कौतुक केले. विठ्ठलच्या या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत असतांनाच नगरपरिषद प्रशासन व रोजंदारी कर्मचारी संघटना द्वारा सत्कार करण्यात आला.
             मांगली(रै) येथील विठ्ठल विधाते यांनी त्यांच्या शेतात केलेल्या उपक्रमाची माहिती नुकत्याच जिल्ह्याच्या भेटीवर आलेले जेष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी त्यांची स्तुती केली व शासनाकडे विषय पोहोचवून सदर पॅटर्न कसा राबवता येईल याकरिता पाठ पुरावा करण्याची हमी दिली.
             विठ्ठल विधाते हा मांगली (रै.) या गावचा रहिवासी असून येथील नगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी आहे. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचे उदरभरण करणे कठिण जात असल्यामुळे विठ्ठलने नवरगांव (बिट) येथे चार एकर शेती ठेक्याने घेवुन शेतीव्यवसायाला सुरवात तर केली मात्र हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असल्याने जंगली डुक्कर, रोही, नीलगाय, हरण, कोल्हे, लांडगे, आदि जनावरांच्या हैदोसाचा रात्रीच्या वेळेस त्रास होवु लागला. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी विठ्ठलने घरीच असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग केला. मोबाईलच्या जमान्यात आऊटडेटेड झालेल्या डेकला (साऊंड सिस्टम) पेनड्राईव्ह लावुन शेतात आणले. साऊंडबौक्सला पावसापासुन वाचविण्यासाठी टिनाच्या पिप्यात ठेवले. ईंटरनेटमधुन वाघ व कुत्रा या प्राण्यांचे आवाज डाऊनलोड करून पेनड्राईव्हमधे सेव्ह केले व   रोज रात्री मोठ्या आवाजात वाजवायला सुरवात केली. या आवाजाने भयभीत होवुन जंगली प्राणी शेतात यायला घाबरु लागले व पर्यायाने शेतपीक व वन्यप्राणी दोहोंचे संरक्षण झाले.
       विठ्ठलच्या या युक्तीने शेतक-यांसमोर आदर्श निर्माण झाला. वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी महेशकर व वनविभागाचे अधिकारी तथा अनेकांनी प्रत्यक्षात शेतात जावुन पाहणी केली व विठ्ठलच्या या युक्तीचे कौतुक होवु लागले. विठ्ठलच्या या उपक्रमाची माहिती वनविभाग व नगरपालिका पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचवणार आहे.
           विठ्ठलसारखे शेतकरी गांव व शेतीप्रगतीस चालना देतात, असे गौरवोदगार ना. शरद पवार यांनी काढले.
         माजी आमदार साळुंखे गुरुजी यांनी सदर विषयाचं महत्त्व ना. पवार यांचेपर्यंत आधीच पोहोचविले होते. पवार साहेबांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. व सदर विषयाची दखल घेतली. यावेळी राजेन्द्र वैद्य उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.