সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 25, 2017

वाहनाचा पाठलाग, ठाणेदाराचा अपघात

समूद्रपूर :अवैध दारुची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाटलाग करण्यास निघालेल्या ठाणेदाराचे वाहन रस्तावरील गिट्टी वरुन उसळुन रस्त्यांच्या बाजुला असलेल्या नालीत जाऊन धडकल्याने ठाणेदारच जखमी झाल्याची घटना घडली आली आहे.
२४ नोव्हेबंरला राञी ३.३० चे दरम्यान समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रविण मुंडे यांना मुख्रबीराकडुन नागपुर -  चंद्रपुर मार्गाने चंद्रपुर कडे अवैधरीत्या वाहनात दारुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली.  हे कळताच ठाणेदार प्रविण मुंडे स्वताचे खाजगी वाहन मारुती स्विप्ट क्रमांक   एमएच ३१ एफए  ४१३६ ने  निघाले व आपल्या कर्मचाऱ्यांना पोलिस वाहनाने त्वरीत येण्याचे सांगत समुद्रपुर - जाम मार्गाने जात असताना ३३ केव्ही उपकेंद्राजवळ जवळ त्यांची गाडी नविन बनत असलेल्या रस्त्यावरील गिट्टी वरुन उसळत सरळ रस्त्याच्या बाजुला असलेल्या खोल नालीत जाऊन धडकले.  यामध्ये त्याना किरकोळ जखम झाली असली तर त्यांना गुप्त मार लागला डॉक्टरांनी सांगीतले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.