সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 24, 2017

दीपस्तंभ मित्र परिवाराचे पुरस्कार जाहीर

वर्धा- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संलग्न "दीपस्तंभ मित्र परिवार, वर्धा" च्या वतीने दिल्या जाणारा महात्मा गांधी समाजसेवी पुरस्कार प्रतिथयश पत्रकार मनोज भोयर यांना तर महात्मा फुले शिक्षक पुरस्कार लक्ष्मण काटवे, विकास वातकर यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती दीपस्तंभ मित्र परिवाराचे संयोजक विजय कोंबे आणि अध्यक्ष चंद्रशेखर ठाकरे यांनी दिली आहे. २५ डिसेंबर रोजी मातोश्री सभागृहात होणाऱ्या व्याख्यानमालेप्रसंगीं मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
      महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीशी संलग्न असणाऱ्या दीपस्तंभ मित्र परिवाराची स्थापना २०१४ मध्ये करण्यात आली. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी अवघे जीवन समर्पित करणाऱ्या फुले दाम्पत्याचे स्मरण चिरंतर राहावे या उद्देशाने दीपस्तंभ मित्र परिवाराने वर्ध्यात व्याख्यानमाला सुरु केली आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या वर्षी (२५ डिसेंबर २०१४) "शिक्षण व्यवस्थेचा राजकीय आशय" या विषयावर डॉ यशवंत सुमंत (तत्कालीन- राज्यशात्र विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ) यांचे व्याख्यान झाले. यशवंतराव दाते स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचा "महात्मा गांधी समाजसेवी पुरस्काराने" आणि "उच्च प्राथमिक शाळा, चानकी कोपरा (सेलू) येथील शिक्षक राजेंद्र इंगोले यांचा महात्मा फुले शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
      व्याख्यानमालेच्या दुसऱ्या वर्षी (१७ जानेवारी २०१६) "आजचे शिक्षण - चिंता आणि चिंतन" या विषयावर "निशाणी डावा अंगठा" आणि "सर्व प्रश्न अनिवार्य" चे लेखक, कवी रमेश इंगळे-उत्रादकर यांचे व्याख्यान झाले. राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रा शेख हाशम यांचा "महात्मा गांधी समाजसेवी पुरस्काराने" आणि " प्राथमिक शाळा हावरे ले-आऊट सेवाग्राम (वर्धा) येथील शिक्षक प्रकाश कांबळे यांचा "महात्मा फुले शिक्षक पुरस्काराने" सन्मान करण्यात आला.
     व्याख्यानमालेच्या तिसऱ्या वर्षी (२५ डिसेंबर २०१६) "स्वामी विवेकानंद आणि आजचे शिक्षण" या विषयावर सुप्रसिद्ध कथाकथनकार, "सारांश शून्य" आणि "बे-एके-बे" या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक डॉ संजय कळमकर (अहमदनगर) यांचे व्याख्यान झाले. सामाजिक कार्यात अग्रणी असणारे वैद्यकीय व्यवसायी डॉ रविदत्त कांबळे यांचा "महात्मा गांधी समाजसेवी पुरस्काराने" आणि उच्च प्राथमिक शाळा कापसी (हिंगणघाट) येथील शिक्षक अनंतकुमार नारायणराव बोबडे यांचा "महात्मा फुले शिक्षक पुरस्काराने" सन्मान करण्यात आला.
     सावित्रीआई स्मृती व्याख्यानमालेच्या चौथ्या वर्षी सोमवारी (२५ डिसेंबर २०१७) "देशाला गरज : नव्या शिक्षणाची... नव्या शिक्षकांची...!" या विषयावर सुप्रसिद्ध लेखक, शिक्षण तज्ज्ञ माजी प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांचे व्याख्यान होणार आहे.
     व्याख्यानमालेचे औचित्य साधून दीपस्तंभ मित्र परिवाराच्या वतीने दिल्या जाणारा "महात्मा गांधी समाजसेवी पुरस्कार" यावर्षी प्रतिथयश युवा पत्रकार मनोज भोयर यांना आणि "महात्मा फुले शिक्षक पुरस्कार उच्च प्राथमिक शाळा निमगाव (वर्धा) येथील शिक्षक लक्ष्मण काटवे आणि प्राथमिक शाळा काकडदरा (आर्वी) येथील शिक्षक विकास वातकर यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल प्रदान केला जाणार आहे.
    जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या प्राथमिक शाळांना रुपये १० हजारापेक्षा अधिक रोख किंवा वस्तू स्वरूपात मदत करणाऱ्या देणगीदारांचा यावर्षीपासून "राजर्षी शाहू महाराज शाळास्नेही पुरस्कार" देऊन सन्मान केल्या जाणार आहे. चंद्रकांत मून (झाडगाव- वर्धा), अमोल भोगे (करंजी- वर्धा), अरुण डबले (दिघी- देवळी), अविनाश गौरशेट्टीवार (सुकळी बाई- सेलू), रोशन क्षीरसागर (वाहितपूर- सेलू) यांना यावर्षी राजर्षी शाहू महाराज शाळास्नेही पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.