नागपूर /प्रतिनिधी:
नागपुरातील
भर गर्दीच्या म्हणून ओळखल्या जाणा-या मध्यवर्ती सीताबर्डी भागातून जात
असलेल्या मेट्रोच्या बांधकामातील एक मोठा पिलर शुक्रवारी दुपारच्या सुमारास
अचानक कोसळला.परिसरातील भिडे कन्या विद्यालयासमोरच्या मार्गावरील हा पिलर
कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या घटनेवरून नागपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . गेल्या काही दिवसाअगोदर देखील नागपूर येथिक मेट्रोच्या बांधकामापैकी एक पिल्लर कोसळल्या गेल्याची घटना समोर आली होती.या घटनेत २ अभियंत्यांना निलंबित देखील करण्यात आले होते परत त्याच घटनेची पुनरावृत्ती आज घडली असून नागपूरकरांच्या सुरक्षा वाऱ्यावर आहे का असं प्रश्न उपस्थित होत आहे