সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 23, 2017

घातपात घडु नये या करीता चंद्रपुर पोलिसांची माॅक ड्रिल

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर जिल्हयातील काही भाग हा नक्षलग्रस्त असुन यास गडचिरोली आणि तेंलगणा या नक्षलग्रस्त भागतील सीमा लागुन आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपुर जिल्हा पोलीस दल नेहमी वेगवेगळया योजना आखुन जिल्हयात कुठेही लहान मोठा घातपात होवुन नये या दृँटीकोनातुन जनतेच्या सुरक्षेसाठी आणि जिवितास व मालमत्तेस कोणतीही हाणी पोहचणार नाही या करीता पोलीस दल नेहमीच कार्यरत असतो. याकरीता पोलीस विभागद्वारे नेहमी पेट्रोलिंग, नाकेबंदी राबवुन वेळोवळी वर्दळीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन बस स्टाॅप येथे माॅक डिंल घेवुन एखादा घातपात घडुन आल्यास पोलीसांनी त्यास कसे समोरे जावे याबाबत पोलीस विभाग वेळोवळी प्रात्याक्षीक घेत असतात.
चंद्रपुर पोलीसांकडुन मा. श्रीमती नियति ठाकर, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, श्री. हेमराजसिंह राजपूत, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात  दिनांक 22/11/17 रोजी बस स्टाॅप चंद्रपुर दिनांक 23/11/17 रोजी रेल्वे रेल्वेस्टेशन बल्लारशाह येथे माॅक डिंल प्रात्याक्षीक घेण्यात आले. सदर माॅक डिंल मध्ये बस स्टाॅप वर बेवारस बॅग मध्ये बाॅम्ब असल्याचे माहितीवरून घेण्यात आली. सदर प्रात्याक्षीक मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर, श्री. सुनील कुमार नायक, आणि सबंधित पोस्टेचे प्रभारी अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागातील सुरक्षा विभाग, दहशदवाद विरोधी पथक, बाॅम्ब शोध पथक  जलद प्रतिसाद पथक,श्वान पथक, दंगा नियंत्रण, पथक,यांनी सहभाग घेतला. सदर प्रात्याक्षीक मध्ये संपुर्ण बस स्टाॅप ची कसुन तपासणी कण्यात आली. त्यामध्ये पोलीस पथकास बेवारसरित्या दोन आक्षेपार्ह बॅग मिळुन आल्या. सदर बॅग बाॅम्ब शोधक  पथक आणि श्वान पथकाच्या सहायाने तपासणी केली असता बॅग मध्ये काही आढळुन आले नाही.
याबरोबरच चंद्रपुर पोलीस दलातर्फे जनतेस असे आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता तसेच कोणतेही आक्षेपार्य लिखान, वस्तु किंवा एखादी संशयित  व्यक्ती दिसुन आल्यास ताबडतोब पोलिसांना माहिती दयावी. व अशा प्रकारे स्वान विरोधी व्यक्तीच्या विरोधात पोलीसांसोबत ठामपणे उभे राहुन पोलीस दलास सहकार्य करावे.






শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.