সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 25, 2017

भारतीय संविधान जागृती विविध स्पर्धेचे आयोजन

ब्रम्हपुरी -
ब्रम्ह्पुरी येथे दिनांक :- २६/११/२०१७ ला भारतीय संविधान जागृती विविध  स्पर्धेचे जनजागृती अभियान अंतर्गत रुख्मीनी सभागृहात विदर्भ स्तरीय निबंध वक्तृत्व या विषयावर करण्यात येत आहे.
ही स्पर्धा विविध वयोगटात विभागली गेलेली असून पहिला वयोगट १३तें १७ "भारतीय संविधान हाच खरा राष्ट्रीय  ग्रंथ " या वयोगटातील स्पर्धक वक्तृत्व व निबंध लिखान करणार आहेत.दुसरा वयोगट १८ तें  खुला वयोगट या वयोगटातील स्पर्धक याना राष्ट्र उभारणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या  विषयावर वक्तृत्व व निबंध लिखाण करणार आहेत.विजेत्या स्पर्धकाना पहिल्या वयोगटातील स्पर्धकाना प्रथम पुरस्कार १०००हजार रु. ,द्वितीय पुरस्कार  ७००रु.,तृतीयपुरस्कार  ५०० रु. देण्यात येईल. तर दुसऱ्या वयोगटातील स्पर्धकांना प्रथम पुरस्कार  १५०००हजार रु.द्वितीय पुरस्कार १२००० हजार रु. तृतीय पुरस्कार १००० हजार रु. वस्पर्धकांना  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विजेत्याना स्पर्धकाना मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे.हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाला चालना देणाराआहे.उपक्रमासाठी दी.बुद्धिस्ट एम्प्लाईज आणि नॉन एम्प्लाईज सोशल असोसीएशन ब्रम्हपुरी, ओबीसी संघटना तालुका ब्रम्हपुरी ,धम्म प्रचार केंद्र ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वीचारमंच ,महिला संघटना,ऑल इंडिया आदिवासी कर्मचारी फेडरेशन ,छत्रपती शिवजन्मोत्सव समिति,युवा जनकल्याण संस्था ब्रम्हपुरी ,आदर्श लोकसंचालित साधन केंद्र ,मागासवर्गिय आदिम कृति समिति,मुस्लिम संघटना ,फुले,शाहू-आंबेडकर वीचार संवर्धन समिति, महामाया महिला मंडळ,बौद्ध समाज महिला मंडळ ब्रम्हपुरी , युथ फेडरेशन,श्रीसंत रवीदास चर्मकार बहूउदेशिय सर्वांगीण विकास मंडळ,महंत सामाजिक व सांस्कृतिक विकास मंच ब्रम्हपुरी आदि विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.
या कार्यक्रमाला मा.श्री.प्रशांत परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी ,देवेश कांबळे,सहाय्यक गटविकास  अधिकारी पं.स.ब्रम्हपुरी डॉ.चेतन जाधव ,प्रा.डॉ.धनराज खानोरकर ,मुख्याध्यापक मंगेश खवले ,प्रा.नामदेव जेंगठे,अँड.केशव जवरे खांडवा ,अँड. स्मिता कांबळे ,अँड.नंदा फुले ,अँड. विजय नाकतोडे व दीपक सेमस्कर उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील.
  या कार्यक्रमात नागरीक व विध्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवहान सर्व संघटनांनी केला आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.