সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 19, 2017

चंद्रपुरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मोटारसायकलवरून भरधाव वेगाने आलेल्या दोन बाईकस्वार चोरटय़ांनी महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना बाबुपेठ परिसरात घडली.

दररोज प्रमाणे बाबुपेठ परिसरातील एक महिला व एक युवती ह्या दोघेही जेवण झाल्यानंतर नेताजी चौकातील मार्गावर शतपाऊली करत फिरत होत्या ,ईतक्यात दोन चोरटे दुचाकी वरुण मागुन   येत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व दोन मोबाईल  खेचून चोरुन नेल्याची घटना शनिवारी रात्री घडली मिळालेल्या महितीवरुण फिर्यादी महिला
महादेव मंदिर परिसरात राहतात त्या नेताजी चौक येथे फिरायला गेले होते.
 ही घटना परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याची तक्रार महिलांनी महाकाली पोलीस चौकीमध्ये दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व माहिती घेत पुढील तपास शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपुर्द करण्यात आला.

या बाईक स्वारांना लवकरात लवकर पकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.