बाजारगाव:- बाजारगाव येथून 4 किमी अंतरावर असलेल्या चिंचोली पठार येथे सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया झाली यामध्ये भाजप समर्थकांचा सरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक याचा उपसरपंच व तीन सदस्य अशी निवड झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी समर्थक बाजारगाव येथे मदिरा घेण्यासाठी येत असताना भाजप समर्थक सरपंच नंदकिशोर संतोष पुंड(३७) रा.चिंचोली पठार ,ता हिंगणा जि-नागपूर यांच्या दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात शाब्दिक वाद झाला. हा वाद दि २०/११/२०१७ ला साय.६ वाजता बाजारगाव येथील पांजरा फाटा येथे झाला परंतु परिसरातील व्यक्तींच्या मध्यस्ती ने वाद संपविण्यात आला.
दोन्ही पार्टी रागाच्या भरात गावात गेलें परंतु आनंदात वादाचे विरजण पडल्यामुळे दोन्ही पार्टी बाजारगाव येथिल अफलातून बियर बार मध्ये दारू पिण्यासाठी आले व एक मेकांना शिवी गाळी करण्यास सुरुवात झाली शिवीगाळी चे रूपांतर हाणामारी त झाल्यामुळे लगेच कोंढाळी पोलिसांना कळविण्यात आले व दोन्ही पार्टी विरुद्ध १०७,११६,१५१ या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली यामध्ये भाजप समर्थक सरपंच नंदकिशोर संतोष पुंड(३७),दिवाकर श्रीकृष्ण मसराम (३४),तसेच राष्ट्रवादी समर्थक चंद्रशेखर मधुकर भालेराव(४८),विजय चेतराम लोहकरे(४०) व नरेंद्र देवेंद्र लोहकरे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास कोंढाळी पोलीस करीत आहे.
Tuesday, November 21, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য