चंद्रपूर /प्रतिनिधी :
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती चंद्रपूर, भारतीय बौद्ध
महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने
दि. २५ व २६ नोव्हेंबर ला संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबर ला सायंकाळी ४ वाजता संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला
भव्य ऐतिहासिक मोटार कार,बाईक व आटो रॅली चे आयोजन करण्यात येणार आहे. या
रॅलीचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक करणार आहेत.या रॅली
चा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर येथून होणार
आहे.
२६ नोव्हेंबर या दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब
आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन व सामूहिक राष्ट्रगान करून संविधान
सन्मान रॅली चा प्रारंभ होणार आहे. या रॅली चे उदघाटन जिल्हाधीकारी आशुतोष
सलील तर प्रमुख अतिथी पोलीस अधीक्षक नियती ठाकर, जिला परिषद मुख्य
कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर व समितीचे मुख्य संयोजक प्रवीण
खोब्रागडे आदींची उपस्थिती राहणार आहे.