शंकरपूर /प्रतिनिधी:
शंकरपूर
येथील रहिवासी तूळशीराम मारुती व्यवहारे वय 65 वर्षे यांचा दुचाकी
वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शंकरपूर कांन्पा रोडवर शनिवारी सकाळी
11.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. शंकरपूर येथील शेतकरी आपल्या शेतात
पावडा घेऊन पायदळ जात असताना शंकरपूर कडून कान्पाकडे भरधाव वेगाने पल्सर
हे दुचाकी वाहन आले. वाहनांवरून नियंत्रण सुटल्यामुळे त्याची धडक तुळशीराम
मारुती व्यवहारे यांना बसली व या धडकेत त्यांच्या जागीच निधन झाले .त्यांना
शंकरपूर प्रा. आ.केंद्रात आणले असता मृत घोषित करून उत्तरीय तपासणीसाठी
चिमूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास शंकरपूर पोलिस करत असून जखमी
दुचाकी स्वाराला ब्रह्मपुरी येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.