সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 11, 2017

आता ताडोबात घ्या हत्ती सफारीचा आनंद

 चंद्रपूर / प्रतिनिधी:
 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जर तुम्ही फिरायला जायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे 13 नोव्हेंबर 2017 पासून ताडोबाने पर्यटकांसाठी 1 आनंदाची ची बातमी देत हत्ती वरून जंगल सफारी करता येणार असल्याचे सांगितले आहे. याकरीता  मोहर्ली गेटवरून 2 हत्ती सफारी करिता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सुरूवातीला सकाळ फेरीत 8 पर्यटक व दुपारी 8 पर्यटक असे दिवसाला 16 पर्यटक हत्ती सफारीचा आनंद घेवू शकतील. 2 ते 12 वर्षाचे आतील पर्यटकांना 500 रुपये प्रती फेरी तर प्रौढ पर्यटकांना 1000 रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारले जाईल. सदर सफारी 1 दिवसाकरीता राहील.

          सदर सफारी आरक्षणाकरीता उपसंचालक (कोर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-255980 या क्रमांकावर किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली यांचे भ्रमणध्वनी क्रमांक 9423599822 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.