সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 11, 2017

सरपंचांनी आदर्श ग्राम निर्माण करावेः डाॅ.पोतदार

 राज्य सरकारचा त्रिवर्षपुर्ती अभिनंदन सोहळा
       नागपूर / प्रतिनिधी -   जिल्हयातील ग्रामिण भागातील भाजपा कार्यकत्र्यांच्या मेहनतीमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 136 ठिकाणी विजय मिळवुन मोठे यश संपादन करता आले.मात्र या यशाने हुरळुन न जाता ग्रामिण क्षेत्रात आणखी व्यापक काम करण्याची गरज आहे.आपआपल्या गावांचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी जोमाने कामाला लागले पाहिजे भाजपच्या प्रत्येक सरपंचाने आपले गाव आदश्ज्र्ञ ग्राम म्हणुन निर्माण करावे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डाॅ.पोतदार यांनी केले.

        गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभागृहात 10 नोंव्हेंबर रोजी आयोजीत भाजपाप्रणीत राज्यसरकारचा त्रिवर्षपुर्ती अभिनंदन सोहळा व सरपंच ,सदस्य यांचा सत्कार पार पडला व्यासपिठावर आ.अनिल सोले ,आ.आशिष देशमुख, माजी आ.अशोक मानकर ,जि.प.अध्यक्षा निशा सावरकर,माजी जि.प.अध्यक्ष अशोक धोटे ,भाजपाचे जेष्ठ नेते आनंदराव ठवरे,संध्याताई गोतमारे,दिलीप जाधव,आनंदराव राऊत,मनोज चवरे,अजय बोढारे,अर्चनाताई डेहनकर,प्रतिभा मांडवकर,अरविंद गजभिये,पे्रम झाडे,संजय टेकाडे ,किशोर रेवतकर,अविनाश खळतकर,विकास तोतडे,आदी मान्यवर मंडळी व सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
       यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषनात डाॅ.पोतदार म्हणालेत की,गावाचा विकास झाला तर राज्याचा विकास होईल यासाठी समाजातील प्रत्येक माणसाचा शेतकÚयाचा आर्थिक,सामाजिक,शारिरिक ,मानसिक,व शैक्षणिक विकास होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपले मुख्यमंत्री अहोरात्र काम करीत आहे.सातबारा आॅनलाईन करणे,डीजीटल ग्रामपंचायती तयार करणे कृषी प्रक्रीयेवर आधारीत उद्योग निर्मिती यासारख्या अनेक योजना शासनाने सुरू केल्या आहे.आपल्या गावाच्या विकासासाठी व राज्याच्या उत्थानासाठी कडक कायदे करीत भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आज महाराष्ट्रात प्रस्थापित केले आहे.यातुन आपण आपल्या विकासासाठी भर दयावा असे यावेळी त्यांनी सांगितले.
        कर्यक्रमामध्ये राज्याचे उर्जामंत्री व नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हजरी लावली होती. यांनी नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले व त्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले सरपंचपदी आरूढ झालो म्हणजे आपले काम संपले,अशी भावना कुणीही  बाळगु नये.राज्य व केंद्र सरकारने ग्रामविकासावर सर्वाधिक लक्ष देऊन काम केले आहे. सरकारने सरपंचांचे अधिकार क्षेत्र वाढविले असून डिजिटल ग्रामपंचायतीमुळे आता केंद्रांचा सरळ ग्रामपंचायतीशी संबंध येणार आहे.विकास निधीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर अवलंबुन राहण्याची गरज नाही.त्याचबरोबर पालकमंत्री या नात्याने मी देखील निधी कमी पडु देणार नाही.हजारो योजना ग्राविकासाच्या आहेत.तेव्हा या योजनांचा अभ्यास करा.प्रस्ताव कसे तयार करावे,कुठली योजना कशी राबवायची ,त्यासाठी विभागाकडे पाठपुरावा करायचा या सर्व बाबींच्या माहितीचे तंत्र अवगत करा.असा विकासाचा मंत्र यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित सरपंचांना दिला.या कार्यक्रमामध्ये नागपुर जिल्हयातील भाजपचे सर्व नवनिर्वाचित सरपंच,सदस्य व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.अरविंद गजभिये यांनी केले.व आभार प्रदर्शन श्री प्रेम झाडे यांनी केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.