সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 20, 2017

जात धर्म पंत न पाहता विकास हेच माझे ध्येय: आ.संजय धोटे

चंद्रपूर/प्रतिनिधी:
गोरगरीब जनतेच्या जीवनात सुखाचे दिवस यावो हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून टेबुरवाही गावावर माझे विशेष प्रेम आहे या अगोदर पण या गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिली आहे यापुढे गावाच्या विकासासाठी पूर्ण पणे सहकार्य करणार असून असच प्रेम व आशीर्वाद आपल्याकडून मिळल अस मत आमदार अँड संजय धोटे यांनी आदिवासी समाज भवन व बोअरवेल भूमीपजन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.


यावेळीं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, तर प्रमुख अतिथी मनून जि.प.सदस्य सौ मेघाताई नलगे,जि.प.सदस्य सुनील उरकुडे,प.स.सदस्य मंगेश गुरनुले,प.स.सदस्य रामदास पुसाम,गडचिरोलीचे जि.प.सदस्य अँड लालसू नरोटे,सरपंच सौ रत्नमाला गेडाम,उपसरपंच चेतन जयपुरकर,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मडावी,भाजपा नेते संजय जयपुरकर,उद्धव कुळसंगे,प्रदीप बोबडे,गणेश झाडे,कोडापे सर, गावातील पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते

आमदार संजय धोटे पुढे म्हणाले आपल्या गावाची मागणी लक्षात घेता आमदार स्थानिक विकास निधीतून १६ लाखाचे आदिवासी समाज भवन मंजूर करून दिले.तसेच बस स्टॉप वर लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी मनून बोअरवेल सुद्धा उपलब्ध करून दिली.कोणत्याही विकास कामासाठी जात धर्म पंत न पाहता विकास करण्याचे माझे ध्येय आहे,डोंगरगांव पर्यटन स्थळ बनविण्यासाठी डी पी सी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असून त्याकरिता आपल्या सहकार्याची गरज भासणार आहे,यावेळी भगवान बिरसा मुंडा व क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.देवराव भोंगळे यांनी आपल्या मनोगता प्रसंगी बोलताना भगवान बिरसा मुंडा यांना समरण केले व जल,जंगल,जमीन या अधिकारासाठी लढणारे थोर पुरुष मनून भगवान बिरसा मुंडा यांचे नाव कोरल्या जाते असे विचार याप्रसंगी व्यक्त केले, कार्यक्रमाचे संचालन कोडापे सर तर आभार प्रदर्शन उद्धव कुळसंगे यांनी केले कार्यक्रमात गावातील नागरिक व आदिवासी बांधवांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.