चंद्रपूर/प्रतिनिधी :
चंद्रपूरचा स्थानिक कलावंताना घेवून चित्रपट माध्यमाची रुची असणाऱ्या तरुणांनी बनवलेली तीस मिनिटांचा ‘नूर’ हा लघुपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात धुमाकूळ घालतोय. नुकत्याच हैद्राबाद मध्ये पार पडलेल्या भारताचा विसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एशियन पॅनोरामा कॉम्पीटीशिनमध्ये एकशे आठ देशांमधून नूरची निवड झाली होती.
चित्रपट महोत्सवात प्रेक्षकानी तसेच प्रसारमाध्यमांनी नूरची विशेष दखल घेतली. जानेवारी महिन्यात मुंबईत होणाऱ्या १५ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुद्धा नूरची निवड करण्यात आलेली आहे.
नूर मध्ये चंद्रपूरची अवनी शिंगरू, सिम्पल तामगडे, सचिन गिरी, सुशील सहारे, संजय वासनिक, सहारा मेश्राम तसेच डॉक्टर चेतन भामरेचा ह्यांचा प्रमुख भूमिका आहेत. ह्या लघुपटाचे खास वैशिष्ठ म्हणजे या लघुपटातील जास्तीत जास्त कलाकारांनी कॅमेरापुढे पहिल्यांदा काम केलय. जास्त उल्लेख करावा लागेल तो ह्या लघुपटातील बाल कलाकार अवनी शिंगरू आणि सिम्पल तामगडे या दोघांचा. या दोघांनीही या लघुपटात जीव ओतून काम केलय. नुरची कथा मुस्लीम कुटुंबातील कथा असूनसंपूर्ण लघुपट चंद्रपूर शहरामध्ये चित्रित करण्यात आलाय.
या लघुपटाचे लेखन राकेश दुर्योधन आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी केले असून दिग्दर्शनाची बाजू शैलेश दुपारे ह्यांनी सांभाळलेली आहे. या लघुपटाची निर्मिती अमूल रामटेके पिक्चर्स, होरायझन एंनटरटेनमेंट आणि लावण्यप्रिया क्रीयेशन यांचा सयुक विद्यमानाने झाले असून निर्माता म्हणून गुड फूड्सचे अमूल रामटेके, भूपाली रामटेके, प्रेम रायपुरे, फुलचंद मेश्राम, नंदकिशोर सोनारकर, मेघना शिंगरू, ताबिश काझी, संजय वासनिक आणि मंगेश दुपारे यांनी केली आहे.