चंद्रपूर- केंद्रावर 57 वी महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत पहिले नाटय पुष्प सादर झाले. नाटक “अंधार पाहीलेला माणुस” लेखक सतिश पावडे, दिग्दर्शक राजीव बावणे होते. गाडगेबाबांच्या तरुण पणापासुनचा प्रवास या नाटकाव्दारे मांडला गेला. गाडगेबाबांच्या आयुष्यावर चित्रपट निघाले किंवा पुस्तके वाचन्यात आली. पण डेबुचा गाडगेबाबा पर्यंतचा प्रवास नाटकातुन मांडला गेला आणि त्यांच्या आयुष्यात घडणा-या प्रसंगातुन कसे गाडगेबाबा झाले हे पहिल्या अंकात मांडण्यात आले. दुस-या अंकात गाडगेबाबांच्या बायकोनी त्यांच्या प्रत्येक गोष्टी स्वीकारत त्यांना दिलेली साथ व त्यांच्या सोबत असल्याचा समाधान हे एका वाक्यातन येतं त्या म्हणतात कि तुमच्याशी लग्न करुन तुमच्या मुलांची आई झाली. पण तुम्ही लोकांचे बाबा झाल्यामुळे मी पण आपसुकच सगळया लोकांची आई होवु शकली. त्या सोबतच एका प्रसंगात बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गाडगेबाबांना भेटायला येतात. तेव्हा बाबासाहेब आपल्या अस्वस्थताचे कारण गाडगेबाबांना सांगतात की मला धर्मांतर करायचा आहे आणि त्यासाठी मला बौध्द धर्म योग्य वाटतो. याबाबतीत तुम्हाला काय वाटतं. यावर गाडगेबाबा म्हणतात तुम्ही योग्य विचार करत आहात. असा विषय नाटकातुन मांडण्यात आलेला आहे. कबीर आणि तुकाराम यांच्या विचारांचा पगडा व अंधश्रध्दे विरुध्दच बंड या नाटकातुन पाहायला मिळातो. त्यांच्या आयुष्यात आलेले अंधार आणि त्या अंधारातुन प्रकाशाकडे चाललेली वाटचाल हा या नाटकाचा गाभा आहे. एक मोठी टिम घेवुन हे नाटक करणं हे कौतुकास्पद आहे. कलाकारांनी चांगली कामे केलेली आहे. परंतु काही वेळा संवाद ओव्हरलॅप होत होते. लाईट घेतांना काही चुका झाल्या. नेपथ्य चांगल होतं. दिग्दर्शकांनी लोक नाटयाचाही वापर करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत नाटक प्रेक्षकांना गाडगेबाबांचा विषय भावला. राज्य नाटय स्पर्धेच्या निकालात अंधार पाहीलेला माणुस निकालात किती प्रकाश पाडु शकेल. हे निकालाअंतीच कळेल.
Monday, November 13, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
कार्पोरेट जगतामधील वास्तवावर भाष्य करणारे ‘चाहुल’ चंद्रपूर- कलारसिक यवतमाळ या संस्थेने मंगळवारी प्रशांत दळवी लिखीत ‘चाहुल’ या नाटकाचा प्रयोग साद
सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार चंद्रपूर/प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान
दीड लाखांवर धान उत्पादकांना फटका चंद्रपूर : पट्टयातील संपूर्ण शेती तुडतुड्याने एक लाख ६५ हजार ५९७ शेतकºयांना फटका बसला आहे.
‘‘ रंगबावरी’’ ने भरले स्पर्धेत रंग, सर्वांग सुुंदर सादरीकरण चंद्रपूर- दि. 22 नोव्हेंबर 2017 रोजी नवोदिता चंद्रपूर या संस्थेने श्रीपाद प्रभाकर जोषी लिखित रं
भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपुरात भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु असतांनाच
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व्यायाम शाळेच्या स्टोर रूम ला आग चंद्रपूर/प्रतिनिधी: रविवारी सकाळी ११ ते ११.३० च्या दरम्यान शहरातील परिवहन कार्यालय रोडवर सामाजिक
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য