नवी मुंबई : नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिल्मी स्टाइलने बँकेवर टाकण्यात आलेल्या या दरोड्यामुळे नवी मुंबई पोलीसही चक्रावून गेले आहेत.जुई नगर सेक्टर-११ मध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडा पडल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी बँक उघडण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या बाजूला असलेलेल्या दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी या बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याची माहिती मिळू शकली नाही. बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानात या भुयाराचे उगमस्थान आढळून आलंय. त्यामुळे या दुकानाचा मालक आणि दुकानातील नोकरांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. हे भुयार एका रात्रीत खोदलं गेलं नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. पूर्ण प्लॅनिंग करूनच एखाद्या टोळीने हे भुयार खोदलं असावं, असं पोलीस सुत्रांनी सांगितलं. एवढं मोठं भुयार खोदलं जात असताना आसपासच्या परिसरातील लोकांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? यावर पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Monday, November 13, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
रामदासपेठेतील सलून आणि हाॅटेलमधून 8 मुली ताब्यात नागपूर/प्रतिनिधी:- शहरातील उच्चवर्णियांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या रामदासपेठ येथील ‘अजय
विश्वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव कोल्हापूर/सांगली : सांगलीत पोलीस कोठडीत अनिकेत कोथळेचा झालेला संशयास्पद मृत्यू व त्याचा मृ
’पोक्सो' कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय परिषदमहाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित परिषदेत औरंगाबादेत देशभरातील तज्ज्ञ होणार सहभागीमुंबई/प्रति
बिग बीचा बिघडला मोबाईलमहानायक अमिताभ बच्चन मुंबईला रवानानागपूर/ प्रतिनिधीगेल्या पंधरा दिवसांपासून नागपुरात झुंज चित्रपट च
विधानपरिषद पोटनिवडणूक; प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी मुंबई :शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुक रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण
अनिकेतच्या खूनातील आरोपींच्या फाशीसाठी सरकार प्रयत्नशीलसांगली/प्रतिनिध
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য