वर्धा- जिल्हयातील सेलु तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सिंदी(रेल्वे) येथे
वार्ड क्र.८ मधे राहणाऱ्या युवकाची नजिकच्या कवठा गावातील हनुमान मंदिर जवळ
बनलेल्या उंच गतीरोधकावर पल्सर दुचाकी वाहन उसळून खाली कोसळल्याने दोन
मुलांचे वडिल विनायक भोले(४५) यांचा घटनास्थळीच म्रुत्यु झाल्याची खळबळ जनक
घटना समोर आली आहे.सदर घटना आज दुपारी २ वाजताचे सुमारास घडली असल्याचे
सांगण्यात येत आहे.बोअरवेल दुरुस्ती करुन आपल्या कुटुंबाचा गाडा
ओढून त्यांच्या गरजा पुर्ण करणारा विनायक आज कामा निमित्त सकाळीच सोनेगावला
गेला होता. दुपारी परतीच्या प्रवासात घरी पोहोचण्याचे बेताने निघाला असता
कवठा गावातील हनुमान मंदिराच्या समोर असलेल्या गतीरोधकावर दुचाकी वाहनाने
उसळी घेतल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व वाहनासह तो खाली कोसळला. यात
त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Thursday, November 09, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য