সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 09, 2017

चंद्रपुरात ब्राउन शुगर विक्री करणाऱ्या दोघांना अटक


चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून याच अंतर्गत रामनगर पोलिसांनी कारवाई करत दोन तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही तस्करांकडून पोलिसांनी पोलिसांनी २७ हजार रुपये किमतीचे (३.२१० ग्राम ब्राऊन शूगर), २ लाख ५ हजार ३८० रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल, असा एकूण २ लाख ४३ हजार ७४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 शहरातील अष्टभुजा परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचे सेवन व  तस्करी- विक्री होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरुन रामनगर पोलिसांना मिळाली होती .मिळालेल्या माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांच्या पथकाने अष्टभुजा परिसरातील रमाईनगर परिसरात धाड टाकली,या धाडीत सहा तरुण ब्राऊन शूगरचे सेवन करताना आणि सोनू साव व राजू धानी हे दोन युवक ब्राऊन शूगरची विक्री करत असतांना आढळून आले.
पोलिसांनी अष्टभुजा वॉर्डातील सोनू रमेश साव याच्या घरी धाड टाकली या धाड़ीत पोलिसांनी घटनास्थळावरुन ब्राऊन शूगर समेत २ लाख ५ हजार ३८० रुपये रोख व दोन मोबाईल फोन असा लाखोचा मुद्देमाल जप्त केला.

मिळालेला माल जप्त करत पोलिसांनी या सम्पूर्ण आरोपींची चौकशी करत वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केले असल्याचे निष्पन्न झाले.या वरुण त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.सदर तपास चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत  यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या नेतृत्वात प्रमोद कोटनाके, दिनकर धोबे, एपीआय प्रमोद बानबले.डीबी पथकाचे बंटी बेसरकर,पुरूषोत्तम चिकारे, राकेश निमगडे,रूपेश पराते ,सुरेश धाडसे, सुरेश कसारे,  बालकृष्ण पुलगामकर व  डीबी पथकाचे बंटी बेसरकर, रूपेश पराते, पुरूषोत्तम चिकारे, राकेश निमगडे, अशोक मंजूलकर आदींनी केले

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.