সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 17, 2017

नागभिडच्या मुख्याध्यापकाची तंबाखूमुक्त कार्यशाळा संपन्न.

बाळापूर (नागभीड)
दिवसेंदिवस शालेय विद्यार्थांमध्ये वाढणारे तंबाखुजन्य पदार्थांचे वाढते सेवन. व त्यामुळे होणारे विविध आजार .  याला पायबंद करावा या पवित्र विचारांने संपूर्ण भारतात तंबाखुमुक्ती कार्यक्रम सलाम फाउंडेशान मुंबईच्या वतीने राबविण्यात येतो.  हा कार्यक्रम महाराष्टात शिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने  राबविला जात आहे.  या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्टात शिक्षक, व अधिकारी यांना प्रशिक्षण देवून माेठ्या प्रमाणात तंबाखूमुक्त शाळाउपक्रम राबविण्यात, येत आहे.

                            या उपक्रमाअंतर्गत नुकताच नागभिड पंस  मधील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा कर्मविर विद्यालय नागभिड येथे संपन्न झाली.सदर कार्य शाळा शिक्षण विभाग पंस.  नागभिड जि चंद्रपूर., स्व.  रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था वर्धा, व सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आली.   या कार्यशाळेच्या अध्यक्षतेस्थानी नागभिड पंस चे गटशिक्षणाधिकारी नागोजी भानारकर हे होते. तर प्राचार्य देविदासजी चिलबुले कर्मविर कनिष्ट महाविद्यालय नागभिड, हरीश्चंद्र पाल ,राज्यस्तरीय प्रशिक्षक ,तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, तसेच सदश्य चंद्रपूर जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समिती, अरविंदजी साखरकर शि. वि अधिकारी. कोत्तमकोंडावार मँडम केंद्रप्रमुख, तालुका प्रशिक्षक सौ. मंजूषा साखरकर व देवानंद तुळकाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
तंबाखूमुक्त साठी इमेज परिणाम

या कार्यशाळेत तालुक्यातील समस्त शाळेचे 125 हून अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते.  या कार्यशाळेप्रसंगी प्रास्ताविक  माहीती हरीश्चंद्र पाल यांनी केले.  या प्रास्ताविक भाषणातून त्यांनी तंबाखूमुक्त कार्यक्रमाची व अशाप्रकारच्या कार्यशाळेची आवश्यकता काय? यावर प्रकाश टाकला. तर विदर्भातील खर्रा या तंबाखुजन्य पदार्थाचे सेवनामुळे देशात सर्वाधिक तोंडाचे कँन्सर रूग्णअसल्याचे त्यांनी सांगीतले व या भयंकर रोगापासून भावी पिढी वाचाविणे गरजेचे असल्याचे मत प्रदर्शित केले.  तसेच   देविदासजी चिलबुले यांनी मुख्याध्यापकांनी प्रामाणिकपणे मनावर घेतले तर शाळा तंबाखुमूक्त करणे कठीन नसल्याचे स्वत:चा अनुभव कथन करून सांगीतले. व नागोजी भानारकर यांनी नागभिड तालुक्यातील  बहूतांश शाळा शिक्षकांच्या प्रयत्नाने तंबाखुमूक्त झाल्याचे मान्य केले पण  त्याचा दस्तावेज सादर करण्यास ते कमी पडल्याने सदर शाळा तंबाखुमूक्त करू ऩ शकल्याचे त्यांनी मान्य केले व अशाप्रकारचा दस्तावेज सप्रमाण सादर करावा असे प्रशिक्षणार्थींना आवाहन केले.
       कार्यशाळेची सुरूवात तंबाखु आणि तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन ही समस्या कोणा एकट्याची नाही हे मंजूषा साखरकर यांनी प्रशिक्षणार्थींना समजावून सांगतांना उंदीर,  कोंबडा, डुककर व बैल यांची कथा सांगीतली तर सी. बी एस. सीबोर्डाचे तंबाखुक्त शाळेचे निकष हरीश्चंद्र पाल,  देवानंद तुळकाने व सौ साखरकर यांनी समजावून सांगीतले तर वेळेवर निर्मान झालेल्या शंकाचे समाधान पाल यांनी केले.
    कार्यक्रमाचे संचालन देवानंद तुळकाने सर यांनी तर आभार मंजूषा साखरकर यांनी केले.
कार्यशाळेचे यशस्वीतेकरीता सौ बी. एच . मडावी बी. आर सी नागभिड व कर्मविर हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.