সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 17, 2017

‘पद्मावती’चा वाद

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्‍मावती सिनेमा येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण ही पद्मावतीच्या भूमिकेत तर रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीच्या तर शाहिद कपूर राजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘पद्मावती’चा वाद काही मिटण्याचे  नाव घेत नाहीये. करणी सेनेनंतर ब्राह्मण समाजाने या चित्रपटाच्या प्रदर्शनला विरोध केला आहे. इतकेच नाही तर जयपूरची रॉयल फॅमिलीनेही  सिनेमाच्या विरोधात दंड थोपटले असून  जयपूरच्या पूर्वाश्रमीच्या राजकुमारी आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदार दीया कुमारी यांनी राजस्थानमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. दुसरीकडे, पद्‍मावती वादात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली असून  गडकरी यांनी चित्रपट निर्मात्यांना कठोर निर्देश दिले आहेत.
अभिव्यक्तीच्या नावावर  निर्मात्यांनी इतिहासासोबत छेडछाड करू नये, असे गडकरी यांनी सांगितले ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. इतिहास रुपेरी  पडद्यावर दाखवताना निर्मात्यांनी सांस्कृतिक संवेदना लक्षात ठेवणे गरजेचे असून पद्‍मावतीच्या इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली आहे यामुळे लोकांमध्ये रोष आहे. सिनेमाला विरोध करणे हा लोकांचा अधिकार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, कोणत्या संविधानाने संजय लीला भंसाळी यांना इतिहासासोबत छेडछाड करण्याचा अधिकार दिला, असा सवाल करणी सेनेने केला आहे.

संजय लिला भन्साळीच्या 'पद्मावती'वरून सुरू झालेल्या वादाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या चित्रपटावरून केलेल्या टिप्पणीनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणींनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सर्व महाराजांनी ब्रिटीशांसमोर गुडघे टेकले होते का? या थरूर यांच्या टिप्पणीवर ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह आणि अमरिंदर सिंह यांचे काय म्हणणे आहे, असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे राजपूत राजांच्या घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांची नावे घेऊन त्यांनी थरुर यांना लक्ष्य केले आहे.

'पद्मावती' चित्रपटावरून सुरू झालेल्या वादात शशी थरूर यांनी उडी घेतली होती. मान-सन्मानाला धक्का बसत असल्याचा दावा करत काही तथाकथित शूर महाराजे एका चित्रपट निर्मात्याच्या मागे लागले आहेत. पण त्याच महाराजांनी ब्रिटीशांनी आदर-सन्मान पायदळी तुडवल्यानंतर तेथून पळ काढला होता, अशी टिप्पणी केली होती. त्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. मी राजपूत समाजाविरोधात टिप्पणी केल्याचा खोटा प्रचार भाजपच्या काही अंधभक्तांनी केला आहे. राजपूत समाजाच्या भावनांचा आदर करणे सर्वांचेच कर्तव्य आहे. भाजप आणि सेन्सॉर बोर्डाने त्याची काळजी घेतली पाहिजे, असे थरूर यांनी स्पष्ट केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.