সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 15, 2017

महाकाली मंदिर संबंधी मुद्देनिहाय माहिती द्या: युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील महाकाली मंदिरातील वार्षिक दर व दान किती? या लोकांचे दान जाते तरी कुठे ? असे अनेक प्रश्न व मंदिरात येणाऱ्या भाविकांना होणाऱ्या समस्या व गैरसोय अशा मागण्यांना घेऊन आज युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सत्याग्रह उपोषण केले.
                              चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिर असून येथे महाराष्ट्र व इतर राज्यातून अनेक भक्त दर्शनास येतात. एप्रिल व चैत्य पौर्णिमेस व नवरात्र निमित्य लाखो भाविक श्रद्धेने येतात. प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील भक्तिणीस देवी प्रसन्न झाली म्हणून गेली ७०० वर्षांपासून या ठिकाणी लाखो भक्त येऊन पूजा करतात व ३ ते ४ दिवस भक्त मुक्कामी राहतात. या ठिकाणी मंदिराकडून भक्तांची राहण्याची, आंघोळीची व संडासाची सोय नाही. भक्तांना उघड्यावर हे सर्व करावं लागते. ऊन वारा पाऊस आल्यानंतर येथील भक्तांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची राहण्याची सोय नसल्याने अनेक भक्त मृत्युमुखी पडले आहेत. तरी मंदिर ट्रस्ट व समिती कडून आतापर्यंत कुठल्याही पद्धतीची सोय करण्यात आलेली नाही.
                           या ठिकाणी लाखो भक्त करोडो रुपयांची देणगी मंदिरात दानपेटीत टाकतात. तसेच अनेक लोक सोन्याचे चांदीचे पुतळे करून देवीला दान देतात. या करोडो रुपयांच्या देणग्या मंदिराला प्राप्त होत असून सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आंघोळीची, पिण्याच्या पाण्याची मानवास लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधांची उपलब्धता इथे नाही. मंदिर ट्रस्ट कडून जनतेच्या सोयीसाठी एकही उपक्रम नाही. या ठिकाणच्या वार्षिक दर व दान किती? या लोकांचे दान जाते तरी कुठे ? असे अनेक प्रश्न व मागण्यांना घेऊन आज युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सत्याग्रह उपोषण केले.
                        महाकाली मंदिर हे शासनाच्या ताब्यात गेले पाहिजे,या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांना निवास आंघोळीची सोय पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. महाकाली मंदिर हे भारतातील ३/१ पीठांपैकी असून या ठिकाणी पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन शासनाने या ठिकाणी विकासकामे करावी. सदर मंदिराची देणगी कोणत्या बँकेत कोणाच्या नावे खाते मध्ये जमा आहे याचे बँक स्टेटमेंट काढावे व कागदपत्र लेखी देण्यात यावे अशी मागणी हि केली आहे.
                          या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून लवकरच आमच्या मागण्यांचे निराकरण करावे अशी मागणी  युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीने केली आहे. या उपोषणात बाबुराव दोहनगावकर , सगुणाबाई गायकवाड, गंगासागर दुधमल, चौताराबाई गवाले, शंद्रमय दोहनगावकर आदी सहभागी झाले होते.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.