সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 21, 2017

वाडी नगरपरिषद पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे निर्देश

पाणीपुरवठा मंत्री लोणीकर 
मुंबई : नागपूर पेरी अर्बन व वाडी नगरपरिषद, जिल्हा नागपूर येथील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

नागपूर पेरी अर्बन व वाडी नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्याबाबत तसेच राज्यातील पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना शेती पंप दराने वीज पुरवठा करण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.लोणीकर बोलत होते.

श्री. लोणीकर म्हणाले, नागपूर पेरी अर्बन व वाडी नगरपरिषद या योजनेत सर्व वाडी-वस्ती समाविष्ठ होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा विभागामार्फत तसेच नागपूर जिल्हा नियोजन समितीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना शेती पंप दराने वीज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी श्री.लोणीकर यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली. तसेच जालना जिल्ह्यातील आष्टी, सेवली येथे कमी दाबाचा विद्युत प्रवाह असल्यामुळे याठिकाणी 132 के.व्ही. इतका विद्युत पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

श्री.बावनकुळे म्हणाले, औरंगाबाद व जालना क्षेत्रातील विद्युत पारेषण व वितरण अधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करुन जालना जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी. नागपूर पेरी अर्बनच्या पाणीपुरवठा योजनेत एकही व्यक्ती वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त योजना तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.