माजी सरपंच तथा शेतकरी गोपीनाथ मोरांडे
ब्रम्हपुरी(गुलाब ठाकरे/प्रतिनिधी)
ब्रम्हपूरी तालुक्यात असलेल्या चारही बाजूने अरण्याने वेढलेल्या बल्लारपुर येथील गोपीनाथजी मोरांडे यानी सांगितलेल्या गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइन द्वारे न सोडता कालव्या द्वारे सोडण्यात यावे अशी शिफारस केली आहे.
गोसीखुर्द कालव्याच काम जवळ पास पूर्ण झालेले आहे.लहान कालवे तयार करुन शेतकऱ्यांना लहान कालव्याद्वारे(पाटाने ) शेतीला पाणि दिल जाते.पण ज्या शेतकऱ्यांना लहान कालव्याद्वारे पाणी होऊ शकत नाही ते शेतकरी आईल इंजिन ,किवा इलेक्ट्रिक साधन (मोटर पंप )या साधनामुळे शेती पीकवली जात असून गुरे ढोरे ,पशु पक्षी इतर प्राणी याना सुद्धा लहान कालव्याच्या सहायाने खुलेआम पाणी उपयोग करीत आहे हे निर्विवाद आहे.पण असे ऐकण्यात आले असून की ज्यां शेतकऱ्यांना पाणी होत नाही त्या शेतकऱ्यांना शेतीतुन तीन फूट खोलीत टाकलेल्या पाईपलाइन द्वारे शेतीला पाणी देण्यात येणार आहे अशी चर्चा परिसरात होत असून शेती ही चढ़ उतार असल्यामुळे शेतीला पाणी होऊ शकत नाही त्या मुळे गोसीखुर्द चे पाणी लहान कालव्याच्य सहायानेच पाणी शेतीला पुरविणे योग्य आहे असे शेतकरी यांची मत आहे.कोणत्याही मंत्री महोदयाना हे कळत नाही की सर्व जीव जंतूनाप्राणी मात्राणा भरपूर पाण्याचा आस्वाद हा कालव्याद्वारे घेता येत होते ते पाणी खोका असलेल्या इंजीनियर च्य डोक्यामुळे हा आनंद शेतकरी ,प्राणी जीवजंतु याना या पाईपलाइन द्वारे घेता येत नाही त्यामुळे गोसीखुर्द चे पाणी पाटानेच शेतीला देण्यात यावे असे मत शेतकरी गोपीनाथजी मोरांडे माजी सरपंच यानी सांगितले आहे.