कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्रात चंद्रपूरचे नाव उंचवावे
आमदार नानाजी शामकुळे :
चंद्रपूर : चंद्रपुरात सांस्कृतिक चळवळ अधिक प्रभावशाली बनावी, कलाकाराला आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्द्य व्हावे, त्यामधून स्थानिक कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्रात चंद्रपूरचे नाव उंचवावे असे मत आमदार नानाजी शामकुळे यांनी व्यक्त केले. ते तुकूम येथील दुर्गामाता देवस्थान येथे स्थानिक आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्याचेवेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अंजलीताई घोटेकर या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार, नगरसेवक मायाताई उईके, नगरसेवक शिलाताई चौहान, देवस्थानचे अध्यक्ष मनोहरराव बोक्कावार होते. प्रस्थाविक मनोहर बोक्कावार यांनी केले.
पुढे बोलताना नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार म्हणाले कि, आमदार नानाजी शामकुळे यांनी तुकूम येथील विकासासाठी कधीही निधीची कमी पडू दिला नाही. या प्रभागाच्या विकास साधण्यासाठी आमदार शामकुळे यांनी मदत केली आहे. हे सांस्कृतिक सभागृह देखील आमदार निधीतून बांधून दिले. यामुळे या भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्द्य झाले आहे.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झालीत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीत सुरेश देशपांडे, शैलेश जुमडे, उशाल घटे, निळकंठराव डांगरे, रमेश मूलकालवार, विलास माहूरवार, भाऊराव साठोने, वसंतराव येरने, वाय. आर. रेड्डी यांनी सहकार्य केले.