সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 17, 2017

''19 नोव्हेंबर'' जागतिक शौचालय दिवस

चंद्रपूर -  '19 नोव्हेंबर'' आज जगात जागतिक शौचालय दिवस म्हणुन साजरा केल्या जातो. मुळात ही संकल्पना आली ती सन 2001 साली स्थापन झालेल्या जागतिक शौचालय संघटनेच्या (WORLD TOILET ORGANIZATION WTO)माध्यमातुन ! ज्यावेळी जगात सर्वत्र दिसत असणारी उघड्यावरची हागणदारी आणी त्यामुळे होत असलेले विविधांगी महाभयावह आजार विशेषता पाण्याची अशुध्दी आणी त्यातुन पसरणारी रोगराई हा उघड्यावरील हागणदारीमुळे निर्माण होणारा प्रमुख अपायकारक घटक WTO च्या नजरेत आला. सन 2001 साला पासुन WTO शौचालय आणि त्यांच्या संबंधित स्वच्छता यावर सतत कार्य करीत  राहिले. हे सर्व करीत असतांना WTO संघट्नेने शौचालयाची असुविधा ,त्यापासुन होणारे आजार,आणि मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणा-या शौचालयाला जगभर कसे निष्काळजीपणे हाताळण्यात येते ,हे सयुक्त राष्ट्रसंघाच्या पटलावर मांडले.
शेवटी 2013 साली राष्ट्र संघाने शौचालय हि अन्न - वस्त्र - निवारा याच प्रमाणे मानव जातीची महत्वाची गरज आहे. अशा निर्णयाप्रत येवुन, शौचालयास महत्वाचे स्थान मिळवुन देण्याच्या दृष्टीने मान्येता दिली. शौचालय विषय जरी राष्ट्रसंघाच्या मान्येतेत आला असला तरी, घरी शौचालय असण्याला आजही थोड्याफ़ार  काही प्रमाणात अस्पृश्या सारखे मानले जाते . ग्रामीण भागात फ़िरत असतांना बरेच अनुभव लोकान कडुन ऍकायला मिळतात. घराच्या आवारात शौचालय सुविधा असणे योग्य की अयोग्य आजही समजावुन सांगाव लागत .हे खुप मोठे दुर्भिक्ष आहे. उघड्यावर शौचास जाण्याच्या सवयीमुळे प्रत्येक्ष अप्रत्येक्ष आजाराचे ,साथीचे प्रमाण हे सतत वाढत असते .त्यामुळे मनुष्याची शारिरीक, मानसिक आर्थिक,या सोबतच सामाजिक हानी होते.. हे सर्व कळुन सुध्दा वळत नसल्यासारखी बाब स्वच्छते विषयी होत आहे.ऍकीकडे घरात चॅनीच्या वस्तुचा सहज उपभोग घेतल्या जातो.यासाठी कुठ्लीही शासनाची योजना नाही,मात्र शौचालय बांधा ,शौचालयाचा नियमित वापर करा,घराचा परिसराची स्वच्छता राखा ,हात नियमित साबणाने स्वच्छ धुवा हे पटवुन सांगण्या करीता शासनाला योजना करावी लागते. याचा कुठे तरी मना पासुन विचार मंथन होणे गरजेचे  आहे. प्रत्येक घरी शौचालय सुविधा निर्माण करुन, त्याचा नियमित वापर करणे, व स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी बाळगणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे .यादिशेने मानसिक परिवर्तन घडुन आणण्याची खरी गरज आहे.
कुपोषण, बालमृत्यु, रोगराई,साथीचे विविध आजार यावर शासन अहोरात्र झटत असत .जर का सर्वांनी स्वच्छता राखली ,स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगवळणी लावल्या आजाराचे प्रमाण निश्चितच कमी झाल्याचे दिसुन येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले की, उघड्यावर हागणदारीत जाणे हे मानसाची रित नसुन वानराची रित आहे. अशीच उघड्यावर हागणदारी होत राहिली तर मानसात व वानरात फ़रक काय ? चला तर मग आज जागतिक शौचालय दिनी सर्वांनी मिळुन एकच संकल्प करुया.....

येथुन पुढे  उघड्यावर शौचास जाणार नाही व कुणास उघड्यावर जावु देणार नाही. नियमित शौचालयाचा वापर करेल व शेजारी मित्र सर्वांना शौचालय वापर करण्यास भाग पाडेल. असा सर्व मिळुन चंद्रपुर जिल्हा स्वच्छ,सुंदर, स्वस्थ,आरोग्यदायी करण्याचा संकल्प करुया.
•कृष्णकान्त खानझोडे , आयईसी सल्लागार,स्वच्छ भारत मिशन,जि.प.चंद्रपुर.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.