সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 17, 2017

२५१ व्या तेली समाज वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

नागपूर/ प्रतिनिधी:
दरवर्षी प्रमाणे तेली समाज बांधवांच्या पाल्यांच्या रेशीमगाठी जुळून येण्यासाठी तेली समाजातर्फे याहीवर्षी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याचे आयोजन ३ डिसेंबर २०१७ रोजी रविवारला दुपारी २ वाजता विदर्भ हिंदी साहित्य संमेलन हॉल, प्रथम माळा, सीताबर्डी मोरभवन,नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.तरीही सर्व तेली समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हाहन तेली समाज मेळाव्याच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.

तेली समाज वधु-वर परिचय मेळाव्याचे साठी इमेज परिणाम
मागील ३७ वर्षांपासून तेली समाजाची सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, नोकरी-व्यावसायिक,आरोग्य, ऐतिहासिक, आर्थिक घडामोडीची संपूर्ण माहिती देणारे "स्नेही पुकार" परिपूर्ण कौटुंबिक मासिकाचे दर महिन्याला वर-वधू बुक प्रकाशनाचे कार्य सुरू असते. करिता नोंदणी करण्यासाठी एक महिना प्रकाशित शुल्क ३५० रू., दोन महिने ६०० रू., चार महिने १२०० रु., मासिकाचे वार्षिक शुल्क ३०० रू.असे शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क पाठविण्याकरिता State Bank of India. A/c.no 33388389181 इतर बँक द्वारे अथवा ऑनलाईन ट्रान्सफर करण्याकरिता IFS code no. SBIN0003462, ब्रांच मेडिकल चौक, नागपूर किंवा मनिऑर्डर/चेक द्वारे अथवा प्रत्यक्ष कार्यालयात नोंदणी करण्यासाठी मो. ९४२२८२७९३३ वर संपर्क साधून संयोजक राजेश पांडुरंगजी पिसे, संपादक स्नेही पुकार कार्यालय रेशीमबाग लोकांची शाळा चौक, ग्रेट नाग रोड, नागपूर-४४००२४ येथे संपर्क साधावा.यासोबतच इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही इमेल व इंस्टाग्राम वरही संपर्क करू शकता यासाठी Gmail:- snehipukar@gmail.com  ,Follow on Instagram: Snehi pukar  या आयडीवर संपर्क करावे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.