नागपूर : नेत्यांच्या सुरक्षेत तैनात स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या जवानाने आपल्या सर्व्हीस पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी एमआयडीसीतील दाते ले-आऊट येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस विभाग हादरले आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. विनोद भगवान धिवांदे (२९) असे मृत जवानाचे नाव आहे. विनोद हा दाते ले-आऊट येथे पत्नी प्रियंका, अडीच वर्षाची मुलगी त्रिसा आणि आई-वडीलांसोबत राहत होता. तो एसआरपीमध्ये तैनात होता. वर्षभरापूर्वीच त्याला प्रतिनियुक्तीवर एसपीयूमध्ये तैनात करण्यात आले होते. व्हीआयपी आणि महत्त्वपूर्ण नेते नागपुरात असल्यावर एसपीयूचे अधिकारी आणि जवानांना ड्युटीवर लावले जाते. उर्वरित वेळी ते ‘रिजर्व्ह’ असतात. विनोद मंगळवारी रात्री घरी आला नव्हता. त्याची सासुरवाडी घराजवळच आहे. ते रात्री सासरीच झोपला. बुधवारी सकाळी ११.१५ वाजता तो घरी आला. त्याला नशेत पाहून पत्नी प्रियंकाने दारु पिण्याचे कारण विचारित सल्ला देऊ लागली. परंतु त्याने तिला कुठलही प्रतिसाद दिला नाही. ‘माझे एटीएम कार्ड तुझ्या घरी राहिले’ असे सांगत तिला एटीएम कार्ड आणण्यासाठी सासरी पाठवले. यानंतर विनोद आपल्या बेडरूममध्ये गेला. त्याचे आई-वडील हॉलमध्येच बसले होते.
Wednesday, September 05, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য