करोडोच्या व्यवसायाला कात्री
कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात विदेशी गुंतवणूक आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्याच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. बंदला देशातील सर्व व्यापारी संघटनांनी समर्थन दिले आहे. कॅटच्या आवाहनार्थ २८ सप्टेंबरला नागपुरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद राहणार असून त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प होणार आहे.फार्मसी संघटनेच्या आवाहनानुसार २८ सप्टेंबरला देशातील सर्व फार्मसी बंद राहणार आहेत. तसेच विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने संपाला समर्थन देताना दुपारी १२ ते ४ या वेळात पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.